मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. एकीकडे जरांगेंची प्रकृती खालावत चालली आहे तर दुसरीकडे सरकारसोबतच्या चर्चाही निष्फळ ठरत आहेत. अशातच जरांगे सरकारविरोधात हल्ला चढवत आहेत. फडणवीस आणि शिंदे राइट गेम करत आहेत, पण आपण आता माज उतरवणार असा हल्लाबोल जरांगेंनी केला आहे.