• Sat. Jun 6th, 2026
    Ambenali Ghat Accident : भय इथले संपत नाही, आंबेनळी घाटातील 2018 सालच्या काळ्याकुट्ट आठवणी जाग्या

    कोकणात आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात 8 जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. आंबेनळी घाटात अशाप्रकारे अपघातात इतक्या जणांचा जीव जाणारी ही पहिली दुर्घटना नाही. आजच्या या अपघाताने 2018 साली झालेल्या भीषण अपघाताच्या काळ्याकुट्ट आठणवी जाग्या केल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रायगड : पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. हे आठही जण स्कॉर्पिओ गाडीतून घरी परतत होते. याच दरम्यान त्यांची स्कॉर्पिओ गाडी 1000 फूट खोल दरीत कोसळली. घटना इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र हळहळला आहे. या घटनेत साताऱ्याच्या आसगाव येथील एकाच गल्लीतील पाच मित्रांचा करुण अंत झाला आहे. आंबेनळी घाटातील या अपघाताच्या घटनेने 2018 साली झालेल्या भीषण अपघाताच्या काळ्याकुट्ट आठवणी जाग्या केल्या आहेत.

    पोलादपूर महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पोलादपूर हद्दीत दाभिळ गावात भीषण अपघात घडला. या अपघाताच्या ठिकाणापासून काही अंतरावर पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळली होती. या दुर्दैवी घटनेत कृषी विद्यापीठाच्या तब्बल 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना 28 जुलै 2018 रोजी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास घडली होती.

    या अपघाताच्या काळ्याकुट्ट आठवणींनी या घाटातील प्रवासाचा धसका या परिसरातील अनेकांनी घेतला होता. त्या अपघाताची केवळ आठवण झाली तरी अंगावर काटा येतो. या दुर्दैवी घटनेने दापोली तालुक्यावरच नव्हे तर अवघ्या कोकणावर मोठी शोककळा होती. हे सगळे कर्मचारी दापोली तालुक्यातील राहणारे होते.

    नेमकी घटना काय घडली होती?

    राष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत झालेल्या भीषण अपघातांपैकी हा एक मोठा अपघात होता. त्यावेळी झालेल्या अपघातात कृषी विद्यापीठाचा केवळ एक कर्मचारी सुखरूप बचावला होता. कृषी विद्यापीठाचे हे कर्मचारी दापोली येथून महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. त्यावेळी भीषण दुर्घटना घडली होती. दापोली येथे वास्तव्य असलेल्या कृषी विद्यापीठातील तब्बल 30 जणांचे संसार हे एकाचवेळी क्षणात उद्ध्वस्त झाले होते. त्याचे परिणाम त्या कुटुंबाला आजही जाणवत आहेत. या भीषण अपघाताने अवघा महाराष्ट्र हादरला होता.

    आंबेनळी घाट मार्गावर त्यानंतर काही उपाययोजना केल्या गेल्या. मात्र त्यानंतरही आंबेनळी घाटात अनेक छोटे-मोठे अपघात होत राहिले आहेत. पावसाळ्यातही याच मार्गावर अनेकदा दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात आणि अपघातांचे प्रमाण मोठे असते. मात्र आज झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ कार ही तब्बल 1000 ते 1200 फूट दरीत कोसळल्याने तब्बल आठ युवकांचा जागीच मृत्यू झाला. मृतक तरुण साताऱ्याचे रहिवासी होते.

    दरम्यान, आंबेनळी घाटात आज झालेल्या अपघातानंतर मदतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. माहितीनुसार, आतापर्यंत चार ते पाच जणांचे मृतदेह मिळाले आहेत. यापैकी दोघांची ओळख पटल्याची माहिती आहे. घाटात सध्या शोध मोहीम सुरु आहे.

    अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे :

    1. महेश अनिल पवार (वय 25 वर्ष)
    2. आदित्य अशोक साळुंखे (वय 21 वर्षे)
    3. रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25 वर्षे)
    4. सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20 वर्षे
    5. अंश समीर चव्हाण (वय 18 वर्षे)
    6. उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21 वर्षे)
    7. अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25 वर्ष)
    8. नितीन किसन नायकोंडे (वय 35 वर्ष)

    आठ वर्षांनंतरच्या अपघातात आठ जणांचा करुण अंत

    या दोन घटना वेगवेगळ्या घडल्या असल्या तरी त्या आंबेनळी घाटात घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये आठ वर्षांचे अंतर आहे. पहिली घटना ही 2018 मध्ये घडली होती. या घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर आठ वर्षांनी पुन्हा आंबेनळी घाटात भीषण अपघाताची घटना घडली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा