महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे जगभरातील अनेक मोठ्या देशांना भारताशी मैत्री ठेवायची आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि वेगवेगळ्या देशांसोबत भारताचे असलेले संबंध याविषयी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. “आपण फॉरेन पॉलिसी आणि डिफेन्स या क्षेत्राकडे लक्ष दिलं पाहिजे. एक नवीन भारत आपण पाहतोय जो कुणाच्याही दबावात येत नाही. आपण पाहिलं, अलिकडच्या काळात व्यापार हे शस्त्र बनत आहे. आपण पाहिलं की, भारतावर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड बॅरिअर्स टाकले. पण ट्रेड बॅरिअर्स टाकल्यानंतर भारत याचक म्हणून गेला नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“भारताने विनंती केली नाही की, तुम्ही ट्रेड बॅरिअर्स उचला. भारताने सांगितलं की, ट्रेड ट्रिडी होईल. पण ती होत असताना आमच्या शेतकऱ्याचं हीत हे त्या ट्रेड ट्रिडीमध्ये असेल तर आम्ही तो करार करु, आणि शेवटपर्यंत भारताने कणखर भूमिका घेतल्यामुळे आज आपण पाहतोय, अमेरिकेसोबतही आपला करार झाला तर आपण आपल्या शेतकऱ्याला करारातून बाहेर ठेवलं. अमेरिकेतील सबसिडाईज माल हा भारतात बॅरिअर फ्री येऊ शकत नाही, अशा पद्धतीने करारात नमूद केलं आणि आपल्या शेतकऱ्यांना इन्सुलेट करण्याचं काम केलं”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“आज स्थिती अशी आहे की, आपण इतक्या महत्त्वाचं मार्केट झालो आहोत की, यामध्ये युरोपने आपल्याशी एफटीए केला. आपण आता अशा स्थितीत आहोत की, आपण ट्रेड डिफिसेटमध्ये नाहीत. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रांसोबत आपण त्यांना जास्त निर्यात करतो आणि त्यांच्या देशातून कमी आयात करतो. अशा पद्धतीने आज आपली रचना झालेली आहे. आपण ऑस्ट्रेलियासोबत एफटीए केला. वेगवेगळ्या देशांसोबत हा एफटीए केल्यामुळे आता मोठी बाजारपेठ भारताला मिळाली”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
‘जगातील सर्व लीडर म्हणत आहेत, भारतासोबत मैत्री ठेवायची’
“प्रत्येक युद्धजन्य परिस्थितीत भारताने आपली भूमिका ठामपणे मांडली. कुणाचीही बाजू न घेता भारताने आपली कणखर भूमिका मांडली. त्यामुळे भारताने जगात आपली अशी पोजिशन करुन ठेवली आहे की, जगातील सर्व लीडर असे म्हणत आहेत की, आम्हाला भारतासोबत मैत्री ठेवायची आहे”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांकडून ट्रम्प यांच्या वक्तव्याचा दाखला
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं कालच भाषण ऐकलं असेल. ते म्हणाले, भारत आमचा मित्र आहे. भारताला जे पाहिजे ते देण्याकरता आम्ही तयार आहोत. जगामध्ये अमेरिका असो, रशिया असो, युरोप असो, अगदी ज्यांचे युद्ध सुरु आहेत, ते प्रत्येक देश म्हणत आहेत की, आमची मैत्री भारताशी आहे. मी आजच एका फोरमच्या लोकांशी बोलत होतो. त्या फोरममध्ये देशातील उद्योगपती होते. ते उद्योगपती म्हणत होते की, आज-उद्या जेव्हाही हे युद्ध समाप्त होईल तेव्हा भारत इतक्या युनिक पोजिशनवर पोहोचेल. भारताने या सगळ्या परिस्थितीत जी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेमुळे यु्द्ध संपल्यानंतर जी इकोनॉमी क्राईज आहे त्यामध्ये भारताला अत्यंत प्रमुख भूमिका मिळेल”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“ही कणखर भूमिका घेत असताना भारताने ऑपरेशन सिंदूरमधून आपली सामरिक शक्ती दाखवून दिली. आपल्याला माहिती आहे, भारत केवळ पाकिस्तानशी युद्ध लढत नव्हता. तर भारत हा एकप्रकारे चीनशीदेखील वॉर लढत होता. कारण पाकिस्तानला शस्त्रास्त, लॉजिकल मदत हा चीन देत होता. सगळा खर्च कुठून येत होता ते सर्वांना माहिती आहे. पण भारताने दाखवून दिलं, भारतात तयार झालेले ड्रोन, मिसाईल्स यांची शक्ती आपण दाखवून दिली. आपण त्यांची युद्धाची विमाने, एअरबेस नष्ट करुन दाखवले. त्यांनी चिनी ड्रोन, मिसाईल आपल्यावर टाकले. पण त्यापैकी एकही मिसाईल आणि ड्रोन भारतावर यशस्वीपणे मारा करु शकला नाही. आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच सर्व ड्रोन आणि मिसाईल पाडले”, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा