• Fri. Jun 5th, 2026

    Pune Metro Water Leakage : शहरात मुसळधार पाऊस! कोट्यवधींचा खर्च अन् प्रवाशांची असुविधा, पुण्याच्या मेट्रोत ‘एसी’तून पाणी; नेमकं काय घडलं?

    Pune Metro Water Leakage : शहरात मुसळधार पाऊस! कोट्यवधींचा खर्च अन् प्रवाशांची असुविधा, पुण्याच्या मेट्रोत ‘एसी’तून पाणी; नेमकं काय घडलं?

    Pune Metro Water Leakage Ramwadi Station : पुणे मेट्रोच्या डब्यातून पाणी गळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ही गळती पावसाची नसून एसी यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे मेट्रो प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

    पुणे मेट्रो पाणीगळती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात शुक्रवारी सायंकाळी जोराचा पाऊस झाल्यानंतर ठिकठिकाणी पाणी साचल्याची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असतानाच, पुणे मेट्रोच्या डब्यात (कोच) पाणी गळत असल्याचा व्हिडिओ सर्वत्र फिरायला लागला. मात्र, हे पाणी पावसाचे नसून, वातानुकूलित यंत्रणेत (एसी) बिघाड झाल्याने ओव्हरफ्लो होणारे होते, असे ‘महामेट्रो’कडून स्पष्ट करण्यात आले आहे, शिवाय हा व्हिडिओ गुरुवारचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

    मेट्रोतही गळक्या छपराचा सामना

    पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून पावसाळ्यात पाणी गळत असल्याचा अनुभव घेतलेल्या पुणेकरांना मेट्रोतही गळक्या छपराचा सामना करावा लागल्याने पाणी गळतीचा व्हिडिओ सोशल मीडिया, ग्रुपवर खूप व्हायरल झाला. अखेर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) त्याबाबत स्पष्टीकरण दिले. हा व्हिडिओ पावसाच्या पाण्याच्या गळतीचा नाही; तर वातानुकूलित यंत्रणेत (एसी) बिघाड झाल्याने मेट्रोमध्ये ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याचा आहे; तसेच हा व्हिडिओ गुरुवारचा असल्याचे ‘महामेट्रो’ने स्पष्ट केले. मात्र, तोपर्यंत सोशल मीडियावर अनेकांनी मेट्रो प्रशासन आणि मेट्रोच्या गळक्या डब्यांच्या घटनेवर टीकेची झोड उठवली होती. काहींनी टीका करताना, ‘कोट्यवधी रुपये खर्चून अशा गळक्या कोचमधून प्रवास करायचा का’ असा प्रश्न उपस्थित केला. गळकी मेट्रो ट्रेन पाहण्याचे भाग्य पुणेकरांना लाभल्याची उपरोधिक टीकाही मेट्रोवर केली गेली.
    Maharashtra TimesPune Metro: महामार्गावरून शहरापर्यंत थेट मेट्रोने प्रवास! पुण्यात लाइन 1 आणि 2चा विस्तार सुरू; कुठे-कशी असतील स्थानकं?

    …त्यानंतर एसी युनिट करण्यात आले बंद

    महामेट्रोने शनिवारी या संदर्भातील सविस्तर खुलासा सोशल मीडियावर शेअर केला. ‘रामवाडी ते वनाझ मेट्रोमध्ये गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास वातानुकूलित यंत्रणेमध्ये अतिरिक्त साठलेले पाणी अचानक ट्रेनच्या डब्यात गळायला सुरुवात झाली. ट्रेन ऑपरेटरच्या हे लक्षात येताच संबंधित एसी युनिट बंद करण्यात आले. त्यानंतर पुढील दोन मेट्रो स्थानकांमध्ये मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी ट्रेनमधील सर्व पाण्याचा निचरा केला. यामुळे ट्रेनच्या संचलनात कोणताही अडथळा आला नाही,’ अशी माहिती महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी दिली.
    Maharashtra TimesPune Crime NEET Paper Leak : पुरावा नष्ट करण्यासाठी अनोखी शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट; मनिषा हवालदारने काय केलं?

    त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त

    ‘पावसाच्या पाण्याचा याच्याशी कोणताही संबंध नव्हता; तरीही एसी युनिटमधील पाणी गळल्याने प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल मेट्रो प्रशासन दिलगिरी व्यक्त करीत आहे,’ असे चंद्रशेखर तांबवेकर यांनी नमूद केले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा