Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळवरून घरी परतणारे प्रवासी गेले अनेक महिने तक्रार करत असून रिक्षा आणि टॅक्सीच्या अभावामुळे त्यांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: डोंबिवली ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास अवघ्या ४५० रुपयांमध्ये झाला; मात्र परतीच्या प्रवासासाठी एक हजार ३०० रुपये मोजावे लागले. पार्किंगचे २५० रुपये शुल्क विचारात घेतले, तरी दुपटीहून अधिक भुर्दंड पडल्याने देशांतर्गत प्रवासासाठी नवी मुंबई विमानतळाला प्राधान्य दिलेल्या या डोंबिवलीकर प्रवाशासमोर व्यवहार्यतेचा प्रश्न उभा राहिला. असाच अनुभव मुलुंडमधील एका प्रवाशाला आला. टॅक्सी मिळण्यात अडचणी, विमानतळाच्या रस्त्यावर संध्याकाळनंतर शुकशुकाट यांमुळे नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास अडचणीचा होणार नाही ना, अशा चिंतेत प्रवासी पडलेले दिसतात.
प्रवास त्रासदायक
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवास करताना वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत असल्याने, पूर्व उपनगरे, नवी मुंबईतील प्रवाशांना नवी मुंबई विमानतळाचा पर्याय अधिक सोईस्कर ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र नवी मुंबई विमानतळापर्यंत जाणे तुलनेने सोपे ठरत असले, तरी विमानतळावरून नियोजित ठिकाणापर्यंतचा प्रवास त्रासदायक ठरत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत 10 टक्के पाणीकपात; 25 मेपासून दोन दिवस संध्याकाळचा पुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका?
मुलुंडमध्ये राहणाऱ्या विजय लाड यांनी अलिकडेच, नवी मुंबई विमानतळावरून मुलुंडपर्यंतचा प्रवास दोन वेळा केला. दोन्ही वेळा त्यांना ओला, उबरसारख्या टॅक्सींची कमतरता असल्याचे निदर्शनास आले. ‘दोन्ही वेळा भर उकाड्यात सुमारे पाऊण ते एक तास टॅक्सीसाठी रांगेत उभे राहिल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. नवी मुंबई विमानतळापासून पनवेल, नेरूळ, बेलापूरपर्यंत बस आहेत. मात्र सोबत सामान असताना बसने रेल्वे स्थानकापर्यंत जाणे हा पर्याय सोयीस्कर ठरत नाही. ओला, उबरसाठी नोंदणी केल्यावर लगेच टॅक्सी मिळत नाही. तसेच यासाठी मुंबईहून मुलुंडला येताना लागणाऱ्या भाड्याच्या दुप्पट भाडे आकारले’, असे त्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी या भागात शुकशुकाट असल्याने, एकटी महिला या विमानतळावरून प्रवास करू शकेल का, असाही प्रश्न त्यांनी केला.
सामान घेऊन जाताना अडचणी
नवी मुंबईकरांना या विमानतळावर पोहोचण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. मात्र विमानतळावर रिक्षांना आत जायला परवानगी नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचे नवी मुंबईतील एका प्रवाशाने सांगितले. रिक्षा स्टँडजवळ विमानतळावर जाण्यासाठी बस उभ्या असतात. मात्र रिक्षातून सामान उतरवून बसमध्ये चढवणे, विशेषतः ज्येष्ठांसाठी जिकिरीचे होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नवी मुंबई विमानतळावरून दादरपर्यंत टॅक्सीचा खर्च अडीच ते तीन हजार रुपये दिसल्याचे सांगत ज्येष्ठ पत्रकार मृण्मयी रानडे यांनी नवी मुंबई विमानतळावरून नियोजित स्थळी जाण्याचा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. मुलुंडला पोहोचण्यासाठी विविध टॅक्सीसेवांचा दर त्यांना ८५० ते एक हजार १०० या दरम्यान दिसत होता. अनेकदा मिनी टॅक्सी बुक केल्यावर, सेडान किंवा प्रीमिअम समोर येऊन उभी राहते आणि मग पुन्हा मिनीसाठी वाट पाहावी लागते, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले.
‘सुपर हायवे’ पुन्हा लांबणीवर; निधीअभावी Mumbai-Pune Expresswayचं दहापदरीकरण रखडणार, 16 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
तोडगा अपेक्षित
नवी मुंबई विमानतळावरून पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणे अपेक्षित असताना, प्रवासाच्या सुविधेमध्ये सुधारणांची अपेक्षा व्यक्त होत आहे. टॅक्सी मिळण्यासाठी लागणारा वेळ, विमानतळापासून मुख्य रस्त्यापर्यंत येताना निर्मनुष्य परिसरामुळे वाटणारी धास्ती, यावर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा