छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून एका इसमाने महिलेवर चाकूहल्ला केला आहे. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : लग्नाचा हट्ट करणाऱ्या इसमाला नकार दिला म्हणून त्याने एका 30 वर्षीय महिलेवर चाकू हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर प्रेम असणं ही भावना वाईट आहे, असं नाही. उलट प्रेम असणं म्हणजे ती जगातील सर्वात सुंदर आणि संवेदनशील भावना आहे. पण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असताना समोरच्या व्यक्तीला गृहीत धरणं योग्य नाही. समोरच्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नसेल किंवा ती व्यक्ती आपल्यासोबत लग्न करण्यास इच्छूक नसेल तर हा त्या व्यक्तिचा अधिकार आहे. आपण एखाद्या व्यक्तीवर आपले विचार आणि भावना लादू शकत नाहीत. याचा विचार आपण नक्कीच करायला हवा.
एकवेळ आपण समोरच्या व्यक्तीची मनधरणी करु शकतो किंवा त्या व्यक्तीला आपला त्या व्यक्तीवर किती जीव आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न करु शकतो. त्यातून समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची जाणीव झाली तर ती व्यक्ती आपल्याबद्दल सकारात्मक विचार करु शकते. किंवा लग्नाला होकार देखील देऊ शकते. पण तरीही ती व्यक्ती इम्प्रेस नाही झाली तर मूव्ह ऑन म्हणून आपण पुढे जाणं अपेक्षित आहे.
समोरच्या व्यक्तीला कदाचित आपल्या प्रेमाची जाणीव होईल आणि ते पुन्हा तुमच्याकडे येईल. पण इतका संवेदनशील विचार किंवा सामंजसपणा प्रेमात ठेवता न येणं हे दुर्दैवी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अशीच घटना घडली आहे. जिथे एका इसमाने एका महिलेला मध्यरात्री माझ्यासोबत लग्न करशील का विचारलं आणि तिने नकार दिल्यावर तिच्यावर चाकूहल्ला केला.
Disha Salian Case:दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सहा वर्षांनी गुन्हा दाखल, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयची कारवाई
नेमकं काय घडलं?
शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्वीपासून ओळख असलेल्या एका तरुणाने “माझ्याशी लग्न कर” असा तगादा लावून, महिलेने लग्नास स्पष्ट नकार दिल्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. ही भयंकर घटना रविवारी (१३ सप्टेंबर) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जय भीमनगर परिसरातील गुलाबवाडी येथे घडली. या हल्ल्यात ३० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून बेगमपुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विशाल कसबे असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विशाल रमेश कसबे (रा. जयभीमनगर, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी विशाल कसबे हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत.
महिलेच्या उजव्या हातावर हल्ला
रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास विशालने पीडित महिलेकडे अचानक लग्नाचा प्रस्ताव ठेवून “माझ्याशी लग्न कर” असा हट्ट धरला. मात्र, पीडित महिलेने त्याला तात्काळ नकार दिला. या नकाराचा प्रचंड राग आल्याने डोक्यात राग घातलेल्या विशालने जवळ असलेला चाकू काढून महिलेच्या उजव्या हाताच्या दंडावर मारून तिला गंभीर जखमी केले.
पीडितेची पोलीस ठाण्यात धाव
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितली. पोलीस ठाण्याच्या अधिकारी पी. टी. यादव मॅडम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार डी.ओ. श्रेणीचे पोलीस उपनिरीक्षक गोमटे यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाडेकर करत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा