Baramati Pandare Woman Murder Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर शनिवारी रोजी सायंकाळी वैशाली यांचे पती तानाजी हे रडत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी त्याच्या आईला दिली. त्यानंतर रंजना पवार यांनी घरी जाऊन पाहिलं असता वैशाली खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.
बारामती पाणदरे महिला हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, पुणे (बारामती) : पुण्यातील बारामती तालुक्यातील पणदरे एमआयडीसी परिसरात महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी गणेश रामचंद्र माने (वय 26, रा. पणदरे) याला अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. शवविच्छेदन अहवालात मृत महिला गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं असून, तिच्या अंगावरील दागिनेही आरोपीने काढून नेल्याचं तपासात समोर आलं आहे. वैशाली तानाजी पवार (वय 30) असे मृत महिलेचं नाव आहे. याबाबत तिची सासू रंजना लक्ष्मण पवार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार काल रविवारी रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर शनिवारी रोजी सायंकाळी वैशाली यांचे पती तानाजी हे रडतअसल्याची माहिती शेजाऱ्यांनी त्याच्या आईला दिली. त्यानंतर रंजना पवार यांनी घरी जाऊन पाहिलं असता वैशाली खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी आणि परिसरातील चौकशीतून पोलिसांना गणेश माने याच्याबाबत माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Mumbai Crime News : टिंडरवर ओळख, बळजबरीने बीअर पाजली, हॉटेलमध्ये दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार; मुंबईतील धक्कादायक घटना
महिलेच्या डोक्यावर, मानेवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा
महिलेवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने तिला हातोड्याने मारहाण केली. त्यानंतर अत्याचार करून टॉवेलने गळा आवळून तिचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं. शवविच्छेदनात महिलेच्या डोक्यावर, मानेवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळल्या. तसेच तिच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व पैंजण आरोपीने नेल्याचं निष्पन्न झाल्यानंतर जबरी चोरीचे कलम वाढविण्यात आले. आरोपीकडून हातोडा, कपडे व दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गर्भवती असताना अत्याचार
दरम्यान, संतापजनक बाब म्हणजे, आरोपीने अगोदर हातोड्याने मारून जखमी केलं. त्यानंतर जखमी अवस्थेतच महिलेवर जबरदस्तीने शारीरिकसंबंध केले. त्यावेळी देखील ती विरोध करत असताना मी केलेलं कृत्य कोणाला सांगू, नये याकरीता टॉवेलच्या साहायाने तिचा गळा आवळून तिला मारून टाकलं.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा