• Sun. Jun 7th, 2026

    Rohini Khadse: महिला-बालविकासमध्ये बदली रॅकेट; तटकरेंचा सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत बोलतो, रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप

    Rohini Khadse: महिला-बालविकासमध्ये बदली रॅकेट; तटकरेंचा सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत बोलतो, रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप

    Rohini Khadse On Aditi Tatkare: एका व्हिडीओद्वारेदेखील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावरील आरोपांवरून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

    रोहिणी खडसे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, जळगाव: महिला व बालविकास विभागातील कथित गैरप्रकारांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

    गायकवाड हे महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत बोलतात, त्यांना धमक्या देतात आणि विभागात बदल्यांचे मोठे रॅकेट चालवतात, असा आरोप करीत रोहिणी खडसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आपल्या ‘एक्स’ हँडलवर द्वीट करीत हे आरोप केले आहेत.

    खडसे म्हणाल्या की, राजेश गायकवाड यांच्याविरोधात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. जळगाव जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनीदेखील गायकवाड यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली असल्याचेही खडसे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. या तक्रारीमध्ये महिला अधिकाऱ्यांशी अपमानास्पद, उद्धट आणि अश्लील भाषेत संवाद साधणे. महिला अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या देणे, मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रॅकेट चालवणे, असे आरोप केले आहेत.

    Maharashtra TimesChandrashekhar Bawankule: विधान परिषदेसाठी शिवसेनेला 4 जागा? निवडणूक एकत्रच लढवण्याची बावनकुळे यांची माहिती
    मंत्री अदिती तटकरे पाठिशी घालताय का?
    ‘महिला आणि बालविकास’ सारख्या संवेदनशील विभागात महिला अधिकाऱ्यांसोबत असा प्रकार घडणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे खडसे यांनी म्हटले. गायकवाड हे २०१९ पासून या विभागात खासगी सचिव म्हणून कार्यरत असून, त्यांच्याविरोधात पूर्वीही अनेक महिलांनी तक्रारी केल्या होत्या. इतक्या गंभीर तक्रारी समोर येऊनही मंत्री तटकरे यांनी गायकवाड यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई का केली नाही? गायकवाड यांना मंत्री महोदयांचा वरदहस्त आहे का? त्यांच्यात काही आर्थिक लागेबांधे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे राज्यातील जनतेला मिळाली पाहिजेत, असेही रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा