• Thu. Jun 18th, 2026
    शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट; कृषी विभागाचा ‘वॉर प्लान’ तयार

    Devendra Fadnavis: यंदा इतिहासातील सर्वात तीव्र एल निनोचा प्रभाव होणार असल्याचा अंदाज असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृती आराखडा तयार केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सौरभ शर्मा, मुंबई: आगामी खरीप हंगामावर ‘ एल निनो ‘चे सावट असल्याने राज्य सरकारच्या कृषी विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले असून, विशेष ‘वॉर प्लान’ (कृती आराखडा) आखत, जलसंधारण, कमी कालावधीची पिके, दुबार पेरणीसाठी बियाणे साठा, शेततळी आणि सूक्ष्म सिंचनावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेविषयी आतापासूनच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

    मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

    यंदा ‘एल निनो’चा प्रभाव लक्षात घेता, राज्यातील पर्जन्यमान सरासरीच्या ९२ टक्के इतकेच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच याविषयी कृषी विभागासह संबंधित विभागांची विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीनंतर आता कृषी विभागाने तयारीचाला वेग दिल्याचे समजते. कृषी विभागाकडून जिल्हास्तरावरील कामांवर, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिल्याचे कळते. त्यानुसार, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम पुन्हा गतिमान करण्यात येत आहे. गावागावांत शिवार फेऱ्या, नाला खोलीकरण, बंधारे आणि पाणलोट विकासाची कामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    Maharashtra TimesEl Nino: अनेक वर्षांनंतर भारतात ‘सुपर एल निनो’; उष्णतेच्या तीव्र लाटा अन् दुष्काळ, हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर

    खरीप हंगामात सुमारे १५२.९७ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे नियोजन असून त्यासाठी बियाणे आणि खतांचा मोठा साठा तयार ठेवण्यात आला आहे. राज्याला गरजेच्या तुलनेत १३९ टक्के बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. २०.१६ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असताना, २८.०६ लाख क्विंटल साठा तयार ठेवण्यात आला आहे. सरकारने अतिरिक्त बियाण्यांचा साठा ठेवण्यामागे संभाव्य दुबार पेरणीची तयारी गृहीत धरलेली असू शकते. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसात मोठा खंड पडल्यास अनेक भागांत दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्याने यंदा बनावट बियाणे आणि खतांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘साथी’ पोर्टलद्वारे बियाण्यांचे उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री यावर डिजिटल पद्धतीने नियंत्रण ठेवले जात आहे.

    Super El Nino मुळे जगातल्या सर्वाधिक Heat असेलल्या 100 Cityमध्ये Indiaतली 95 शहरं, Akola सर्वात उष्ण

    ‘वॉर प्लॅन’मध्ये काय ?

    • गावागावांत जलसंधारण मोहीम
    • नाला खोलीकरण आणि बंधारे
    • शेततळी व प्लास्टिक अस्तरीकरण
    • कमी कालावधीतील वाणांचा वापर
    • आंतरपीक आणि सूक्ष्म सिंचनावर भर
    • पुनर्पेरणीसाठी अतिरिक्त बियाणे साठा
    • बनावट बियाण्यांवर डिजिटल नजर
    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा