‘कथित साठेबाजी होत असल्याचा सरकारचा दावा असेल, तर एकतरी साठा जप्त झाला आहे का, याचे उत्तर देण्यात यावे. साठेबाजी होत नसेल, तर पुरवठा विभाग झोपला आहे का’, असा प्रश्न दानवे त्यांनी उपस्थित केला.
Chandrashekhar Bawankule: विधान परिषदेसाठी शिवसेनेला 4 जागा? निवडणूक एकत्रच लढवण्याची बावनकुळे यांची माहिती
जालना जिल्ह्यात डिझेल विक्रीसंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ‘ट्रॅक्टरची कागदपत्रे आणि नोंदणी क्रमांक दाखवल्याशिवाय कॅनमध्ये डिझेल देऊ नये, असा आदेश प्रशासनाने आहे. मग नांगरणीसाठी भाड्याने ट्रॅक्टर आणणाऱ्या गरीब शेतकऱ्यांनी डिझेल कुठून आणायचे, याचे उत्तर सरकारकडे नाही. जनतेच्या हातातील गाड्या हिरावून घेऊन त्यांच्या हातात हातगाड्या देणे, हाच या सरकारचा मास्टरस्ट्रोक दिसतोय’, असा टोला त्यांनी यावरून लगावला.
… अन्यथा उद्रेकाला सामोरे जा !
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही खोटे बोलले, तरी राज्यातील चित्र इंधनटंचाईची सत्यस्थिती सांगणारे आहे. वाशिम जिल्ह्यात शनिवारी सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. शेतकऱ्यांचे हाल थांबवा आणि तत्काळ इंधनपुरवठा सुरळीत करा. अन्यथा, टंचाईमुळे उद्भवणाऱ्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा’, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी दिला.
राज्यात जनगणनेला धक्का; खासगी विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम देण्यास मनाई
ठाकरेंनी फिरविला मंत्रिपदाचा शब्द
मुंबई: ‘ शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मला एकट्या अपक्षाला मंत्री केले नव्हते, तेव्हा मला ते कॅबिनेट मंत्रिपद देणार होते. पण देताना राज्यमंत्रिपद दिले. शंकरराव गडाख यांना माझ्याऐवजी कॅबिनेट मंत्री केले. ठाकरेंनी कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण, नंतर कॅबिनेट मंत्रिपद शक्य नाही असे सांगितले. मात्र, या मंत्रिपदाच्या अटीवरच त्यांना पाठिंबा दिला होता’, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी केला.
