• Sat. Jun 6th, 2026
    सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्याने रिक्त, राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीची शॉर्टलिस्ट, महाराष्ट्रातील मंत्र्याचं नाव चर्चेत

    Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रमोद हिंदुराव आणि अविनाश आदिक यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ , प्रमोद हिंदुराव आणि अविनाश आदिक यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

    सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्याने रिक्त

    बारामती मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीत विधानसभेवर निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पोटनिवडणूक घोषित केली. घोषित कार्यक्रमानुसार पोटनिवडणुकीची अधिसूचना १ जून रोजी जारी केली जाईल.

    उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ८ जून आहे. उमेदवारी अर्जाची छाननी ९ जूनला होईल. अर्ज माघारीची मुदत ११ जून असून, आवश्यकता भासल्यास १८ जूनला मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी होईल.

    दहा राज्यांमधील जागा रिक्त

    दहा राज्यांतील राज्यसभेच्या २४ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार १८ जून रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
    Maharashtra TimesVidhan Parishad : 17 पैकी 7 जागा द्या, शिंदेंची ठाण्याचीही मागणी; सुनेत्रा पवारांना हव्या पुण्यासह तीन जागा, भाजप पेचात

    भाजपचं बळ जैसे थे राहणार

    वरिष्ठ सभागृहात पुन्हा निवडून येतील अशा नेत्यांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय मंत्री रवनीतसिंग बिट्ट यांचा समावेश आहे. या निवडणुकीनंतर सत्तारूढ भाजप आघाडीचे राज्यसभेतील बळ जैसे थे राहणार असून काँग्रेसला तमिळनाडूच्या मार्गे आपल्या चार जागांत एकाची बेरीज करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रमुख विरोधी पक्षाचे राज्यसभेतील संख्याबळ ३०च्या पुढे जाईल.

    Sanjay Shirsat | हसन मुश्रीफांच्या वक्तव्यावर शिरसाटांचा पलटवार; म्हणाले ‘शिंदेंकडे तक्रार करा’

    यावेळी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधून राज्यसभेच्या प्रत्येकी चार जागा रिक्त होत आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, झारखंड आणि तमिळनाडूत प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होईल.
    Maharashtra TimesCrime News : घरी सांगू का तुला ‘पुरुष’ आवडतात! सात महिन्यांपूर्वी मुंबईत गाजलेलं प्रकरण, तरुणाच्या मृत्यूची फाईल पुन्हा उघडली, बेडरुममधलं काळं सत्य समोर

    विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी

    विधान परिषद आणि राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीमधील इच्छुकांनी भेटीगाठींचा जोर वाढविला असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी माजी आमदार अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, सुनील टिंगरे आणि दीपक मानकर यांच्या नावाची चर्चा आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा