Latur NEET Paper Leak Case Two Doctors Investigation : देशात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता लातूरमधील आणखी दोन डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरण लातूर डॉक्टर चौकशी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, लातूर : ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने लातूरमध्ये आणखी दोन डॉक्टरांची चौकशी केली. पथकाने आतापर्यंत तीन डॉक्टरांची चौकशी केल्यामुळे लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या रविवारी सीबीआयचे पथक लातूरमध्ये आले आहे. पेपरफुटीप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. गेल्या सात दिवसांपासून पथक ठाण मांडून आहे. पथकाकडून पेपरफुटी प्रकरणातील संशयितांची सखोल तपासणी आणि चौकशी केली जात आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉक्टरच्या दवाखान्याचीही तपासणी
पथकाने शुक्रवारी सकाळी जुना औसा मार्गावरील दत्त मंदिराजवळील एका बीएएमएस डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन तपासणी केली. पथकाने काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. बार्शी रस्त्यावरील दयानंद कॉलेजच्या परिसरातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टरच्या दवाखान्याचीही शुक्रवारी तपासणी झाली. त्यानंतर या दोघांचीही सायंकाळी औसा रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात चौकशी सुरू होती. या दोन डॉक्टरांचा पेपरफुटीशी कसा संबंध आला? ते कोणाच्या संपर्कातील आहेत? याबद्दल जोरदार चर्चा सुरू असून, दोषी पालकांचीही चौकशी केली जाणार असल्याची चर्चा आहे. Weather Update: ढगाळ वातावरण… असह्य उकाडा; मुंबईत सकाळी रिमझिम पावसाची हजेरी; पण मान्सूनपूर्व सरींची अजून प्रतीक्षाच
औद्योगिक वसाहतीतील क्लास बंदचा आदेश
लातूर सहकारी औद्योगिक वसाहतीत सुरु असलेले क्लास, वसतिगृहे, खानावळी, अभ्यासिका त्याचप्रमाणे अन्य व्यवसाय तातडीने बंद करण्याचा आदेश लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला.
वसाहतीत उत्पादनाव्यतिरिक्त सुरु असलेले व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी केली होती. दरम्यान, या आदेशामुळे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कोठडीत असलेला आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर आणि कुटुबीयांना दणका बसला आहे. वसाहतीत मोटेगावकर कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या भूखंड आणि इमारत वापराबाबत भाईकट्टी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. त्यानंतर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी संबंधित संस्थेच्या अक्ष्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कळविला. Bike Taxi : पेट्रोलवरील बाइक टॅक्सीला मुभा द्या, कंपन्यांची मागणी; सरनाईक म्हणतात, राज्य सरकारच्या धोरणाविरोधात ठरेल
पुण्यातून तिसरी ‘मनीषा’ जेरबंद
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आणखी मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी आणखी एका प्राध्यापिकेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. मनीषा हवलदार असं या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पुण्यातून मनीषा नावाने अटक होणारी ही तिसरी महिला आहे. मनीषा हवलदार या फिजिक्सच्या प्राध्यापिका आहेत, अशी माहिती आहे. एनटीएकडे असणाऱ्या फिजिक्सच्या प्रश्नांना मनीषा हवालदार हिला अॅक्सेस होता. तसेच यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरेला मिळून मनीषा हवालदारने फिजिक्सचे प्रश्न लीक केल्याचा आरोप आहे. ते लीक केलेले सर्व प्रश्न तपासण्यात आले. यावेळी लीक झालेले प्रश्न हे नीटच्या प्रश्न पत्रिकेसोबत तंतोतंत जुळल्याचं तपासात समोर आलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा