Chandrashekhar Bawankule : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
शिवसेनेने मागणी केलेल्या बहुतांश जागांवर भाजपने एकत्रितपणे अधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला ठाणे मतदारसंघ भाजपकडून देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे भाजप पुणे आणि सांगली-सातारा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत वाटाघाटी करत आहे.
राज्यात जनगणनेला धक्का; खासगी विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम देण्यास मनाई
शिवसेनेला अधिक जागा दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही तशीच मागणी केली जाईल, असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. या भेटीत विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आली असून या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
‘आगामी विधान परिषद निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुती म्हणून एकत्रितरित्या लढणार असून तिन्ही पक्षातील जागावाटपाबाबत चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या बैठकीनंतर होईल’, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिली. तर, या १७ ही जागांवर महायुतीचा उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मंत्री Hasan Mushrif यांचं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य, विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण
या बैठकीत जागावाटपाबाबत जवळपास ९९ टक्के एकमत झाले असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. ‘काही दिवसांपूर्वीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि पक्षातील इतर नेत्यांसोबतही एक बैठक घेतली होती. या बैठकीतही जागावाटपाबाबत चर्चा झाली आहे. जागावाटपाचे सूत्र ठरविताना सध्याचे विद्यमान आमदार आणि त्या त्या मतदारसंघाचे संख्याबळ लक्षात घेऊन मगच जागावाटप पूर्ण करण्यात आले’, असे त्यांनी स्पष्ट केले.
