मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर उच्च स्तरीय अतिशय महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यावर आगामी काळात अल निनोचं मोठं संकट येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी काळात कृषी क्षेत्रावर असणाऱ्या संभाव्य संकटाबाबत माहिती दिली. तसेच या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असणाऱ्या उपाययोजनांची देखील सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेतासाठी पैशांची कमतरता भासू नये यासाठी बँकांना महत्त्वाचे निर्देश दिल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच शेतकरी कर्जमाफी ही 30 जूनपर्यंत करु, अशी देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अल निनोच्या संभाव्य धोक्यावरही चिंता व्यक्त केली. तसेच या काळात काय-काय उपाययोजना केल्या जातील, याबाबत सविस्तर माहिती दिली.
“आज राज्याच्या येत्या कृषीच्या खरीप हंगामाची हंगामपूर्वी तयारीची बैठक घेतली. त्यापूर्वी राज्यस्तरीय बँकिंग किमिटी एसएलबीसीची बैठक झाली. या बैठकीत एकूण कर्जवाटपाबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज कसं मिळू शकेल या संदर्भात सगळी तसबीज करण्यात आली”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
“असं लक्षात आलं की, आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत, आणि ग्रामीण बँक, या मिळून 67 टक्के शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना केवळ 26 टक्के कर्ज देतात. डीसीसी आणि ग्रामीण बँकेचा जो टार्गेटचा अॅचिव्हमेंट आहे ते 80 टक्क्यांच्यावर आहे. पण राष्ट्रीयकृत बँकांचं 67 टक्के आहे. त्यामुळे आज अतिशय कडक शब्दांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलं आहे की, त्यांनी 80 टक्क्याच्यावर टार्गेट पू्र्ण केलं पाहिजे. दुसरं त्यांना सांगण्यात आलं आहे की, सीबीलची मागणी कोणत्याही बँकेने करु नये. या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं आहे की, मुख्यालयमधून प्रत्येक शाखेला पत्र पाठवून सांगितलं पाहिजे की, पीक कर्जासाठी सीबीलची अट नाही. आरबीआयचेदेखील अधिकारी होते. त्यांनीदेखील त्याला पुष्टी दिली आहे. याबाबत आपण आदेश काढले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
“सर्व बँकांशी कर्जमाफीबाबत चर्चा केली आहे. जी काही कर्जमाफी करायची आहे, त्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो निर्णय घेतला आहे तो वेळेत पूर्ण करु अशा पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रावर अल निनोचं संकट, मुख्यनमंत्र्यांकडून चिंता व्यक्त, उपाययोजनांची दिली माहिती
“महाराष्ट्रात सर्वात मोठा हंगाम हा खरिपाचा असतो. त्यानंतर रब्बी आणि उन्हाळी पिकं शेतकरी घेतात. खरिपाचं क्षेत्र १५२ लाख आहे. यामध्ये सर्वात मोठं क्षेत्र सोयाबीन आणि कापूस यांचं जवळपास ८८ लाख हेक्टर असतं. ऊसही आपण मोठ्या प्रमाणात घेतो. आता खरीप हंगामात मोठं संकट हे अल निनोचं आहे. आज हवामान विभागाने केलेल्या मांडणीनुसार, पावसाचं लाँग टर्म अॅव्हरेज ८८ टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. असं असलं तरी ते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे असेल. विशेषत: पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीत हवामानाच्या अंदाजानुसार प्लॅनिंग कसा करता येईल हा प्रयत्न केला आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता आहे. जूनमध्ये पाऊस येईल. त्यापेक्षा कमी जुलैमध्ये येईल. त्यापेक्षा कमी ऑगस्ट आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा प्राथमिक अंदाज आहे. पावसाच्या दोन दिवसांमध्येही मोठं अंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांवर परिणाम होतो. त्यामुळेच जलयुक्त शिवारचे कामे वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यातून पडलेला पावसाचे पाणी आपण जरी थांबवू शकलो तर किमान प्रोटेक्टिवर इरिगेशन करता येईल”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“गेल्या काही वर्षातील अल निनोची जे वर्ष आहेत त्यापैकी 2015 चे वर्ष खूप कठीण होतं. त्या वर्षी मराठवाड्यात 61 टक्केच पाऊस पडला होता. अशा प्रकारची परिस्थिती आली तर काय करायला पाहिजे याबाबत प्रत्येक जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत”, असं देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा