• Fri. Jul 31st, 2026
    महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर


    Marathi News Live: महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याचे आरोग्य उत्तम राहावे, प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस आणि संतुलित आहार मिळावा यासाठी शाळेच्या कोणत्याही दिशेला ५० मीटर परिसरामध्ये जंक फूड उपलब्ध होणार नाही याची दक्षता बाळगावी, असे कडक आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. ओडिशा आणि लगतचा दक्षिण झारखंडचा भाग, तसेच छत्तीसगड येथील तीव्र कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असून या प्रभावाखाली विदर्भ, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, घाट परिसर येथील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे महामुंबईमध्येही शुक्रवारी पावसाचा जोर वाढू शकतो. दक्षिण कोकण, घाट परिसरामध्ये गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *