• Thu. Jul 30th, 2026
    Gadchiroli Rain: गडचिरोलीला पुराचा वेढा! सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस, 15 गावांचा संपर्क तुटला

    म.टा.वृत्तसेवा, गडचिरोली: हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील सिरोंचा, अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषत: सिरोंचा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले असून सुमारे १५ गावांना पुराचा वेढा पडला आहे. अनेक ठिकाणी रपट्यांवरून पाणी वाहिल्याने काही काळ गावांचा संपर्क तुटला होता.

    हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या होत्या. दुपारपर्यंत मुसळधार पाऊस होऊन नदी-नाले धोक्याच्या पातळीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात केवळ हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.

    Gadchiroli News: सीमेवर माओवादी सक्रिय; तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी, १६ पथकांकडून कोम्बिंग ऑपरेशन
    गेल्या २४ तासांत सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १११.२ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल अहेरी तालुक्यात ४०.७ मिमी पाऊस झाला. सिरोंचा तालुक्यातील पेंटिपाका मंडळात तब्बल १७६.५ मिमी, आसरल्ली येथे ११६.६ मिमी, सिरोंचा शहरात ८०.२ मिमी आणि बामणी येथे ७१.६ मिमी पावसाची नोंद झाली. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे ९८.४ मिमी पाऊस झाला. दरम्यान, गडचिरोली, एटापल्ली, मुलचेरा, कुरखेडा, देसाईगंज, कोरची, आरमोरी आणि धानोरा तालुक्यांत दिवसभर रिमझिम सुरू असल्याने वातावरण ढगाळ राहिले.

    मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने बुधवारी शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. त्यातच आषाढी गुरुपौर्णिमेचा सण असल्याने घराघरांत गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांनी पावसात चिंब भिजत सुटीचा मनमुराद आनंद लुटला.

    नागरिकांनी वाहत्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

    Maharashtra TimesMumbai Crime : आठ महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर अमानूष अत्याचार, चेंबूरमध्ये विकृत मानसिकतेचं भयावह रुप; जगण्याची शाश्वती कमी
    येडसिली गावात शिरले पाणी
    सिरोंचा तालुक्यातील येडसिली गावात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यावरील पुलाची क्षमता अपुरी ठरली आणि पुराचे पाणी थेट गावात घुसले. अनेक घरांच्या परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागला. शेतजमिनीही पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. या ठिकाणी अधिक उंचीचा आणि मोठ्या क्षमतेचा पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीला, दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं काय सुरु?
    कोठा-पोचमपल्ली रपटा पाण्याखाली
    गर्कपेठा ग्रामपंचायतअंतर्गत कोठा व पोचमपल्ली येथील रपटा पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला फटका बसला. या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून तातडीने दुरुस्तीची मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत डुरके यांनी केली आहे. याशिवाय पेंटिपाका, रेगुंठा, पर्सेवाडा, कर्जेली, मोयाबिनपेटा, झिंगानूर, रमेशगुडम, लिंगापूर ढोला, गर्कपेठा आणि परिसरातील अन्य गावांमध्येही पुराचा धोका निर्माण झाला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed