• Sun. Jun 7th, 2026

    Kolhapur News: वर्षभरापूर्वीच लग्न, पण इंजिनिअर तरुणाचा आता टोकाचा निर्णय; 33 व्या वर्षीच मृत्यूला कवटाळलं, कुटुंबाला धक्का

    Kolhapur News: वर्षभरापूर्वीच लग्न, पण इंजिनिअर तरुणाचा आता टोकाचा निर्णय; 33 व्या वर्षीच मृत्यूला कवटाळलं, कुटुंबाला धक्का

    Kolhapur Youth Death:वडिलांनी वन विभागातून निवृत्ती घेतल्यानंतर तरुणावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढल्याचे परिसरात बोलले जात आहे.

    वर्षभरापूर्वीच लग्न, पण इंजिनिअर तरुणाचा आता टोकाचा निर्णय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर: कदमवाडी-पाटोळेवाडी परिसरातील लांबोरे हौसिंग सोसायटी जवळ असलेल्या सिद्धी हेरिटेज हौसिंग सोसायटीच्या अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरून तरुण अभियंता श्रीकांत सूर्यकांत काटकर (वय 33) यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या टेरेसवरून सुमारे 70–75 फूट उंचीवरून खाली उडी घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तातडीने रुग्णालयात नेले मात्र त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत नमूद करण्यात आले आहे.

    श्रीकांत हे वन खात्यातील निवृत्त अधिकारी सूर्यकांत काटकर यांचे एकमेव पुत्र होते. लांबोरे हौसिंग सोसायटी येथे वडील सूर्यकांत, श्रीकांत आणि त्यांची पत्नी असा त्यांचा छोटा परिवार राहत होता. श्रीकांत यांचा विवाह वर्षभरापूर्वी पार पडला होता आणि त्यामुळे हा तरुण इंजिनिअर अद्याप कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये स्थिर झाला नव्हता.

    बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्रीकांत यांनी आपल्या वडिलांसोबतच घरी जेवण केले. त्यानंतर वडील आपल्या बहिणींना सोडायला मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडले. ते बाहेर पडल्यानंतर श्रीकांत हे देखील जवळच असलेल्या एका मित्राला भेटून 10 मिनिटांत परत येतो, असे सांगून घरापासून अंदाजे 200 मीटर अंतरावर असलेल्या सिद्धी हेरिटेज हौसिंग सोसायटीतील अपार्टमेंटकडे गेले. ते थेट सहाव्या मजल्यावर चढले. तेथून टेरेसच्या बाजूने असलेल्या मोकळ्या जागेतून त्यांनी खाली उडी घेतली. उडी घेताना झालेल्या आवाजामुळे आसपासच्या रहिवाशांना संशय आला आणि तातडीने शासकीय रुग्णालय आणि शाहपुरी पोलिस ठाण्याला फोन केला.

    पोलिसांच्या प्राथमिक तपासात टेरेसवर त्यांचा मोबाइल आणि अन्य वस्तूंचा तपास केला गेला. मोबाइलचे लॉक काढून शेवटच्या काही नंबरवर केलेल्या कॉलवरून त्यांची ओळख पटली. शाहपुरी पोलिस ठाण्याने अपघाती मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अधिक तपास आणि वैद्यकीय विधिक अहवालानंतरच अंतिम सत्य समोर येणार आहे. तसेच घटनेचे नेमके कारण अजून अस्पष्ट असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल आणि कुटुंबीयांच्या जबाबावरून तपास सुरू केला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा