• Sun. Sep 6th, 2026

समुद्राखालून पाईपलाईन ते PM मोदींचा परदेश दौरा; इंधन दरवाढीवर संजय राऊत गरजले

समुद्राखालून पाईपलाईन ते PM मोदींचा परदेश दौरा; इंधन दरवाढीवर संजय राऊत गरजले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारतीयांना खर्च कमी करण्याचे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर गेल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधानांना लक्ष्य करत केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तिखट शब्दांत टीका केलीय. तर समुद्राखालून गॅसचा पुरवठा करणारी पाईपलाईन सुरू करण्याच्या विचारवरून राऊतांनी खिल्ली उडवली आहे. मोदी परदेश दौऱ्याहून परत येताना समुद्राखालून पाईपलाईन कुठून टाकायची हे बघत समुद्राखालून प्रवास करतील किंवा ते स्वतःच उडी मारतील, अशा शब्दांत राऊत यांनी समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed