Solapur Car Accident : राज्यात गुन्हेगारीसह अपघातांचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. अशातच सोलापूरमध्ये काल दुपारी एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांसह एका चिमुकल्याचा करुण अंत झाला.
सोलापूर अपघात दोन महिलांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. सोलापूर-पुणे महामार्गवरील कोंडी येथे काल सोमवारी रोजी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुण्याहून अक्कलकोटला निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. कोंडी येथ झालेल्या भीषण अपघातात दीड वर्षाच्या चिमुकला आणि दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सिंधू रवी खंडागळे (वय 42), त्यांची बहीण नंदा भाऊराव हाताळकर (वय 45) आणि दीड वर्षाचा रुद्राक्ष मोरे असे मृतांची नावं आहेत.
धावत्या ट्रकला मागून धडक
जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, तर शवविच्छेदनासाठी तीन मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. धावत्या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. Nashik Shiv Sena : बैठकीच्या नावाखाली तेल आणि किराण्याचे डबे मागवून पार्टी, शिवसेना महिला पदाधिकाऱ्याचा गौप्यस्फोट; मंत्र्यांनी टोचले कान
पुण्यातील तिघांचा जागीच मृत्यू
पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील रवी खंडागळे यांचे कुटुंब अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जात होते. या अपघातात सिंधू रवी खंडागळे (वय 42), त्यांची बहीण नंदा भाऊराव हाताळकर (वय 45) आणि दीड वर्षाचा रुद्राक्ष मोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रुद्राक्षचे वडील उमेश प्रकाश मोरे (वय 32) आणि आई साक्षी मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे .सोलापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. Pune News: पिंपरीत नद्यांच्या निधीला सरकारचा नकार; पवना, इंद्रायणीचं पुनरुज्जीवन रखडणार, महापालिका, ‘पीएमआरडीए’ची कोंडी
मुलाला पाहण्यासाठी आई-वडिलांची धडपड
या भीषण अपघातात एका क्षणात दोन महिला आणि लहान बाळ, अशा तिघांचे प्राण गेले. जे कुटुंब कालपर्यंत आनंदाने दर्शनासाठी निघाले होते, त्यांच्यावर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला आहे. लहान रुद्राक्षच्या मृत्यूनं तर सर्वांचेच हृदय पिळवटून गेले. रूद्राक्षचे आई-वडील हे वारंवार रुद्राक्षला पाहण्यासाठी हट्ट धरत होते, पण उमेश यांचे मित्र समजावून सांगत असतानाचं चित्र पाहायला मिळालं.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा