Pune Nasrapur Case Bhimrao Kamble in Cow Shed : 1 मे रोजी नराधमाने मुलीवर जबरदस्ती केली होती आणि तिचा जीव घेतला होता. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
पुणे नसरापूर आरोपी भीमराव कांबळेला गोठ्यात नेलं व्हिडिओ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या संतापजनक प्रकार आणि नंतर तिला संपवल्याच्या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्ह्यासह अख्खा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामुळे नागरिकांचा संताप वाढत असताना पुणे पोलिसांनी तपास आता अधिक वेगाने सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्धचे सर्व पुरावे अन् खडानखडा माहिती गोळा केले असून आता फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवणार आहे. येत्या 10 दिवसात चार्टशीट दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी गुप्तपणे एक पंचनामा केल्याची माहिती मिळाली आहे.
जिथे कृत्य केलं, ‘त्या’ गोठ्यात कांबळेला नेलं
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अत्यंत सस्पेन्स पद्धतीने ही तपास मोहीम राबवली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीला सोबत घेऊन पोलीस नसरापूर येथील घटनास्थळी ठिकाणी दाखल झाले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिसराची बारकाईनं पाहणी केली असून, घटनेच्यावेळी नक्की काय घडलं असावं? याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या गोठ्यात नराधम भीमराव कांबळेनं त्या लेकीसोबत संतापजनक कृत्य केलं, त्या गोठ्यामध्ये नेऊन पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली.
Purandar International Airport: पुरंदर विमानतळाचे ‘टेकऑफ’! पहिल्याच दिवशी 450 एकर जमीन ताब्यात, शेतकऱ्यांना भरगच्च पॅकेज; कोणती गावे समाविष्ट?
अख्ख गाव साखरझोपेत
घटनेच्यावेळी आरोपी कुठे उभा होता? त्याने नक्की कशाप्रकारे हा गुन्हा केला? या सर्व बारीकसारीक गोष्टींचा पंचनामा पोलिसांनी घटनास्थळी केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला अन् आरोपीला गोठ्यात नेलं होतं. त्यावेळी पोलिसांनी आरोपीवर हल्ला होऊ नये, याची काळजी देखील घेतली. यावेळी अख्खं गाव गाढ झोपेत होतं. त्यामुळे कुणालाच याची कुणकुण लागली नाही. Siblings Drown Death: एकाच दिवशी जन्म, मृत्यूही एकसाथच! जुळ्या बहीण-भावाने तलावात बुडून गमावला जीव, पुणे जिल्हा हळहळला
चिमुकलीच्या छातीतही मारहाण
दरम्यान, ही लहान मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत पुण्यात राहत होती. शाळेला सुट्टी लागल्यानं ती नसरापूर येथे आपल्या आजीच्या घरी गेली होती. त्यावेळी 1 मे रोजी तिच्यावर जबरदस्ती करुन तिला संपवण्यात आलं. ससून रुग्णालयाकडून पीडित मुलीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल पोलिसांना नुकताच सुपूर्द केला होता. त्यानुसार, आरोपीने चिमुकलीच्या तोंडात काहीतरी कोंबून तिच्यासोबत संतापजनक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. चिमुकलीच्या पार्थिवाची गुणोत्तर तपासणी ससून रुग्णालयात झाली. त्यानंतर रुग्णालयाच्या न्याय वैद्यकीय शास्त्र विभागात वैद्यकीय तज्ञांनी पार्थिवाची इन कॅमेरा तपासणी केली. नराधमाने मुलीचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार मारल्याचं देखील शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा