• Sun. Jun 14th, 2026

    Mumbai Monorail: मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार! ‘मोनोरेल’ची केवळ अंतिम चाचणी प्रलंबित; लवकरच पूर्ववत होणार सेवा

    Mumbai Monorail: मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार! ‘मोनोरेल’ची केवळ अंतिम चाचणी प्रलंबित; लवकरच पूर्ववत होणार सेवा

    Jacob Circle-Chembur Monorail: 2025मध्ये अनिश्चित कालासाठी ठप्प झालेली मोनोरेल सेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. एक सुरक्षा चाचणी पूर्ण झाली असून दुसरी बाकी आहे. ही अंतिम चाचणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झालेली मोनोरेल परत कधी सुरू होणार याची मुंबईकर प्रतीक्षा करत असताना याची तारीख पुन्हा लांबली असल्याचे स्पष्ट झाले आहे. महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL)च्या ताफ्यात नवी मोनोरेल आली असली तरी त्यांनी सुरक्षा तपासणी आणि प्रमाणीकरणाचा दुसरा टप्पा सुरू केला नाही आहे. यामुळे मोनोरेलला सुरू होण्यास अजून विलंब होणार असून प्रवाशांना मे अखेरची वाट पहावी लागणार आहे.

    7 मेची डेडलाइन लांबणीवर

    यापूर्वी अधिकाऱ्यांनी मोनोरेलसाठी 7 मेची तारीख जाहीर केली होती. परंतु, मोनोरेलच्या चाचणीचा अंतिम टप्पा बाकी आहे. तसेच, काही कामं शिल्लक असल्यामुळे 7 मे रोजी सेवा सुरु करणं शक्य होणार नाही. या कामांसाठी काही आठवड्यांचा कालावधी लागणार असल्यामुळे मे अखेरपर्यंत सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. देशातील एकमेव मोनोरेल मुंबईत वडाळामार्गे जेकब सर्कल ते चेंबूरदरम्यान धावते. फेब्रुवारी 2014मध्ये सुरू झालेली ही मोनोरेल सेवा वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुले 20 सप्टेंबर 2025 पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली.Maharashtra TimesMumbai Metro: मुंबईत 100 किमी लांब मेट्रो नेटवर्क तयार! पुढे 16 नव्या मार्गांवर विकास होणार; ठाणे, नवी मुंबई, विरारपर्यंत विस्तार

    त्यानंतर MMMOCLच्या ताफ्यात उत्पादकाकडून 10 नवे ट्रेन सेट आले असल्यामुळे 7 मे रोजी ही सेवा पुर्ववत होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांतर मोनोरेलची पहिली सुरक्षा चाचणी पूर्ण होऊन व्हेरिटास इंजियाकडून 20 फेब्रुवारी रोजी मंजुरी मिळाली होती. दुसरी सुरक्षा मंजुरी अद्याप शिल्लक आहे. त्यानंतर मोनोरेल रेकचे टायर्स, सिग्नलिंग सिस्टममध्ये बदल केले गेले आहेत. त्यानंतर तापसणीची दुसरी फेरी अजून प्रलंबित आहे.

    दुसरी सुरक्षा चाचणी कधी?

    वर्सोवा-घाटकोपर मेट्रो लाइनची 2014मध्ये तपासणी करून प्रमाणपत्र देणारे मेट्रो रेल्वे सुरक्षेचे निवृत्त आयुक्त पी.एस. बघेल यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. बघेल मोनोरेलच्या रोलिंग स्टॉक, स्वयंचलित दरवाजे, सिग्नलिंग, सेवांच्या वेळापत्रकासह अनेक गोष्टींची तपासणी करतील. ही दुसरी चाचणी अनिवार्य नाही आहे. परंतु, पुन्हा काही तांत्रिक बिघाड होऊ नये या हेतून विशेष उपाय योजना केल्या जात आहेत.

    Maharashtra TimesMumbai Local Accident: लोकलखाली दिसले माणसाचे पाय, प्रवाशांची व्हिडिओ काढण्यासाठी धडपड; भाईंदर रेल्वे स्थानकावर दुपारी खळबळ

    सेवा बंद होण्यापूर्वी मोनोरेल दररोज 18,000 प्रवासी हाताळायची. पावसाळ्यात मोनोमधून दररोज तब्बल 20,000 प्रवासी प्रवास करायचे. 2025च्या मान्सूनमध्ये मोनोरेल अनेकवेळा बंद पडली. त्यानंतर सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली. त्यानंतर नवी मोनोरेल रेक दाखल झाली. पण त्या ट्रेनच्या सुरक्षा चाचणीदरम्यान वडाळा डेपोबाहेर मोनो रुळावरून घसरली. या अपघातात तीन जणं जखमी झाले होते.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा