Bhayander Railway Station: बुधवारी दुपारी 12च्या सुमारास एक व्यक्ती भाईंदर रेल्वे स्थानकावर रेल्वे खाली आलेला दिसला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबई लोकलने मध्ये प्रवाशांना नेहमीच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गर्दीमुळे ट्रेनला लटकून, धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात होत असून प्रवाशांचा मृत्यू होतो. 6 मे रोजी, बुधवारी दुपारी पश्चिम रेल्वेच्या भाईंदर रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकल ट्रेनच्या खाली एक माणूस पडल्या असल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
भाईंदर रेल्वे स्थानकावर दुपारी 12.05च्या सुमारस ही घटना घडली होती. इंस्टाग्रामवर ‘Mirabhyandarofficial’ या अकाऊंटने हा व्हिडिओ पोस्ट केला असून यामध्ये एका माणसाचे पाय ट्रेन खाली दिसून येत आहेत. स्थानकावर खळबळ उडालेली ही दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या व्हिडिओमध्ये एक मृत माणूस ट्रेन खाली आला असल्याचे दिसून आले होते.Mumbai Metro: मुंबईत 100 किमी लांब मेट्रो नेटवर्क तयार! पुढे 16 नव्या मार्गांवर विकास होणार; ठाणे, नवी मुंबई, विरारपर्यंत विस्तार
पश्चिम रेल्वेच्या भाईंदर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5वर ही घटना घडली. प्रत्यक्ष दर्शनींने या व्हिडिओखाली कमेंट केल्या आहेत. त्यानुसार हा माणूस रेल्वे रुळावर उभा होता किंवा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता (कारण अद्याप स्पष्ट नाही) तेव्हा समोरून ट्रेन आली आणि हा व्यक्ती ट्रेन खाली आला. ट्रेन वेगाने जात असल्याने चालकाला ट्रेन वेळेवर थांबवणं शक्य झालं नाही. यानंतर त्यांचा ट्रेनखाली येऊन मृत्यू झाला. या प्रकरणाबद्दल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप काही माहिती दिली नाही आहे. पण या घटनेमुळे स्थानकावर बुधवारी भीतीचे वातावरण पसरले होते.
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
अशा घटनांमुळे रेल्वेवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. यापूर्वीच एसी लोकल ट्रेनची वाढलेली संख्या, अनियमित वेळापत्रक आणि पायाभूत सुविधांच्या कामांमुळे नेहमीच लोकल 10 ते 20 मिनिटे विलंबाने धावत असतात. त्यात अशा घटना घडल्यामुळे वाहतूकीवर अजून परिणाम होतो.
दुपारीच ही घटना घडल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात ट्रेनमधून रुळावर उतरावे लागले होते. लोकलचे डबे आधीच उन्हाने तापले असतात त्यात ट्रेन एकाच ठिकाणी थांबल्याने प्रवाशांचे आणखी हाल होतात.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा