• Sat. Jun 6th, 2026

    Nashik Crime: क्लासमधील शिक्षिकेचं लाजीरवाणं कृत्य; १० वीतील तरुणीला बेडरुममध्ये पाठवलं, तिथं भाच्याने डाव साधला, घटनेनं संताप

    Nashik Crime: क्लासमधील शिक्षिकेचं लाजीरवाणं कृत्य; १० वीतील तरुणीला बेडरुममध्ये पाठवलं, तिथं भाच्याने डाव साधला, घटनेनं संताप

    जयेश साबळे, नाशिक: नाशिक शहरात अशोक खरात आणि TCS महिला लैंगिक अत्याचार अशी दोन संतापजनक प्रकरणे ताजी असतानाच आता खासगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलींवर काही महिन्यांपासून अत्याचार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुलशन कॉलनी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे क्लासचालक शिक्षिकेच्याच मदतीने तिच्या भाच्याने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नाशिकमधील पखाल रोडवरील गुलशन कॉलनीतील एका इमारतीत हा प्रकार घडला आहे. फिर्यादी मुलगी ही संशयित आरोपी राशेदा राशिद शेख यांच्याकडे शिकवणीसाठी जात होती. त्या दरम्यान,राशेदा शेख (रा.तिसरा माळा, कसक पार्क, गुलशन कॉलनी, पखालरोड, नाशिक) हिने विविध कारणांमधून फिर्यादीला त्यांच्या बेडरूममध्ये पाठवले, तिथे आरोपी सिब्तेन रजा शेख (रा.गरीब नवाज मस्जिदसमोर, मेहबूब नगर, वडाळा गाव, नाशिक) या नराधमाने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

    हा प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी आरोपींनी पीडित मुलीला वेळोवेळी धमकावले आणि प्रलोभनेही दाखवली होती. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने धाडस दाखवत पोलिसांत धाव घेतली आणि हे संपूर्ण प्रकरण समोर आले. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच वपोनि पाटील, सपोनि पाटील आणि पोउनि शेख यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोउनि शेख पुढील तपास करत आहेत.

    आरोपी सिब्तेन रजा शेख आणि राशेदा राशिद शेख यांच्या अटकेसाठी पोलीस पथक शोध घेत असून, ते अद्याप फरार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed