• Fri. Jun 5th, 2026
    Vijay Thalapathy साई चरणी नतमस्तक, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती याने आज साई दरबारी हजेरी लावली… अभिनेता ते नेता बनलेला विजय थलपती शिर्डीत येणार असल्याची माहिती मिळताच त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती…विजय थलपतीचे आगमन होताच चाहत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली…चाहते आणि भाविकांच्या मोठ्या गराड्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्थेत त्याला साई मंदिरात नेण्यात आले…यावेळी विजय थलपतीने सर्वप्रथम द्वारकामाई मंदिराचे दर्शन घेतले, त्यानंतर साई समाधीवर माथा टेकवत प्रार्थना केली… काही वेळ समाधीस्थळी थांबत त्याने साईबाबांचे दर्शन घेतले आणि ध्यानमंदिरात काही क्षण ध्यान करत नामस्मरणही केले… विशेष म्हणजे, मोठी गर्दी असूनही विजयने काही भाविकांना नमस्कार करत आपला साधेपणा जपल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विजय थलपती सध्या तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय झाला असून TVK या पक्षाची स्थापना करत विधानसभा निवडणुकीत तब्बल 233 उमेदवार उतरवले आहेत. तामिळनाडूमध्ये सध्या DMK, AIDMK आणि TVK अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे… 24 एप्रिल रोजी मतदान पार पडले असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे…आगामी निवडणुकीत पक्षाला यश मिळावे यासाठीच विजय थलपतीने साईबाबांच्या चरणी साकडं घालत आशीर्वाद घेतल्याची चर्चा सध्या रंगू लागलीय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed