Pune News: रेड्डी यांच्यावर एकूण २१ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील नऊ त्यांच्या शरीरात घुसल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.
पुण्यातील भाजप कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं; २१ गोळ्या झाडून का संपवलं? कारण उघड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: देहूरोड येथील आधार रुग्णालयातून रमेश रेड्डीला रात्री साडेनऊच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात नेले. त्या वेळी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. गोंधळामुळे रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण होते.
देहूरोड येथे मंगळवारी झालेला रमेश रेड्डी यांचा खून सूडसत्रातून झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. रेड्डी यांच्या भावाच्या खून प्रकरणी तुरुंगात असलेला भाऊ आणि आई यांच्या जामिनाला विरोध केल्याने शेख कुटुंबातील सदस्यांनी हा खून केला.
रमेश रेड्डी यांची बहीण शारदा रेड्डी (वय ३९) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीच्या आधारे लखन आगळे, आफताब समीर शेख, अरमान शेख आणि इतर सात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. देहूरोड येथे मंगळवारी (२८ एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
रमेश रेड्डी आणि त्यांच्या मित्राने कपडे खरेदी केल्यावर दुचाकी सुरू करीत असतानाच कार आणि दुचाकीवरील आरोपी तेथे आले. त्यांच्या हातात पिस्तूल आणि कोयते होते. सर्व जण रमेश रेड्डीला शिव्या देऊन त्याच्या दिशेने धावले. रेड्डी आणि त्यांच्या मित्राने लोकांकडे मदत मागितली. मात्र, गोळीबाराचा आवाज ऐकून लोक भीतीने पळाले. रमेश रेड्डी पळून जात असताना आरोपींनी मागून गोळीबार केला आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून आरोपी पळाले. रेड्डीला तातडीने देहूरोड येथील आधार रुग्णालयात व मग पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
खुनामागील कारण काय?
रमेश रेड्डीचा भाऊ विक्रम गुरुस्वामी रेड्डी याच्या वर्षभरापूर्वी झालेल्या खुनात आरोपी शेखचा भाऊ साबीर आणि आई रजिया तुरुंगात असून, त्यांच्या जामिनाला रमेश रेड्डी विरोध करीत होता. तीन महिन्यांपूर्वीच आरोपींनी रेड्डीच्या घरासमोर उभे राहून ‘सर्वांना जीवे मारू,’ अशी धमकी दिली होती. शेवटी मंगळवारी (२८ एप्रिल) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाळत ठेवून रेड्डीचा खून केला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा