Madhavi Naik : ठाणे शहराला आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांच्यानंतर माधवी नाईक यांच्या रूपाने महिला आमदार लाभणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
विनित जांगळे, ठाणे : ठाणे महानगरपालिकेत भाजपकडून सलग दोन टर्म नगरसेवक म्हणून कर्तृत्व गाजवल्यानंतर पक्षाची संघटनात्मक जबाबदारी पार पाडणाऱ्या माधवी नाईक यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली. नाईक यांच्या माध्यमातून ठाणे शहराला भविष्यात, आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांच्यानंतर माधवी नाईक यांच्या रूपाने महिला आमदार लाभणार आहे. त्यामुळे शहरातील पक्षीय संघटन मजबूत होण्यासह तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ मिळवण्याची शक्यता आहे.
नगरसेवक म्हणून सुरुवात
ठाण्यातील श्रीरंग सोसायटी परिसरात राहणाऱ्या माधवी नाईक यांनी १९९७ साली या प्रभागातून महापालिकेची निवडणूक लढवली. त्यावेळी नाईक या तत्कालीन शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख असणाऱ्या अनिता बिर्जे यांचा निसटता पराभव करून ठाणे पालिकेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर २००२ सालीही त्यांनी निवडणुकीत विजयश्री प्राप्त केली. मात्र २००७ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. Vidhan Parishad : पार्थ पवारांनी नाव सुचवलं, ‘देवगिरी’वरील बैठकीत NCP च्या ज्येष्ठ नेत्यांचा विरोध, विधान परिषदेसाठी अखेर उमेदवार ठरला
पक्ष संघटनेत जबाबदारी
“राजकारण म्हणजे समाजसेवेचे माध्यम आहे, सत्तेचे नव्हे,” असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे त्यांना पक्षातील जबाबदाऱ्या मिळत गेल्या. महिला मोर्चा अध्यक्षा, प्रदेश उपाध्यक्ष, आणि गेली तीन वर्षे अत्यंत जबाबदारीच्या भाजप प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
Nilesh Rane : आमसभेला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली, निलेश राणेंकडून संताप व्यक्त
विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकपदावर देखिल त्यांची नियुक्ती करण्यात आली. या जबाबदाऱ्या लीलया सांभाळताना त्यांनी दुष्काळग्रस्त भागात सलग दहा दिवस दौरे करून जलसिंचन योजनांचा अभ्यास केला. त्या क्षेत्रामधील उपाययोजना प्रत्यक्षात राबवल्या. त्यांच्या अर्थ फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून संस्कारवर्ग, व्याख्यानमाला, करिअर मार्गदर्शन आणि महिलांचे समुपदेशन असे उपक्रम राबवले. अखेर भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देत नवी संधी दिल्याने शहरातील पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. Vidhan Parishad Election : मला ‘सतरंजी उचले’ म्हणण्यात ज्यांना… विधान परिषदेवर संधी न मिळाल्याने ट्रोल, भाजपच्या केशव उपाध्येंचं टीकाकारांना उत्तर
सांस्कृतिक क्षेत्रातही ठसा
बी.ए. शिक्षण पूर्ण केल्यानंतर चर्चगेट येथे शासकीय विधी महाविद्यालयात नाईक यांनी एल.एल.बी.साठी प्रवेश घेतला. प्रतिथयश ॲड. विजय आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली क्षेत्रात पाऊल ठेवले. राजकारणाबरोबरच त्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय राहिल्या आहेत. त्यांनी आकाशवाणीवर निवेदिका म्हणून तसेच ‘जंगल बुक’ व काही माहितीपटांसाठी आवाज देत डबिंग क्षेत्रातही काम केले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा