Jalna Accident News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात नळणी बुद्रुकजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
जालन्यात अपघात तिघांचा दुर्दैवी अंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून रोज नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी बुद्रुक गावाजवळ रविवारी (दि. 26) सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन तीन जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे नळणी बुद्रुक आणि बरंजळा साबळे या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशीच वडिलांचा मृत्यू
या अपघातातील मृतांमध्ये सुभाष कचरू साठे (वय 38, रा. नळणी बुद्रुक) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीचा विवाह मंगळवारी (दि. 28 एप्रिल) होणार होता. घरात लग्नाची लगबग सुरू असताना आणि लेकीला हळद लागण्याच्या आनंदाच्या क्षणांपूर्वीच वडिलांचा मृत्यू झाल्याने साठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाचे वातावरण क्षणात शोकसागरात बदलले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कुटुंबाचा एकमेव आधार हरपला
दुसऱ्या दुचाकीवरील अनिल संतोष बोराडे (वय 23, रा. बरंजळा साबळे) याचाही या अपघातात मृत्यू झाला. अनिल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. जालना येथे न्यायालयीन काम आटोपून मित्रासोबत परतत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या मृत्यूमुळे वृद्ध आई-वडिलांचा आधार हिरावला गेला आहे.
Marathi Compulsion : मुदत देऊन मराठी बोलला नाहीत तर? रिक्षा चालक संघटनांच्या बैठकीत मंत्री सरनाईकांचा सवाल; काय घडलं? वाचा A टू Z
अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, विकास साहेबराव साठे (वय 40) आणि सुभाष साठे हे नळणी बुद्रुककडून आपल्या गावी जात होते. त्याच वेळी समोरून येणाऱ्या अनिल बोराडे यांच्या दुचाकीची त्यांच्याशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही जण जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. ग्रामस्थांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.
एक जण गंभीर अवस्थेत
या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जालना येथील कलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तालुक्यात हळहळ
या घटनेमुळे संपूर्ण भोकरदन तालुक्यात शोक व्यक्त होत आहे. विशेषतः एका वडिलांचा मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच मृत्यू झाल्याने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. दोन्ही कुटुंबांवर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा