Bhandara Minor Girl Abused : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना घडत असताना भंडारामध्ये देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आज भंडारा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
भंडारा सार्वजनिक शौचालय मुलीवर अत्याचार
भंडारा : भंडारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डात काल गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एक संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या 3 वर्षांच्या एका चिमुकल्या मुलीला आमिष दाखवून एका 30 वर्षीय नराधमानं सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण भंडारा शहरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, घटनेच्या निषेधार्थ आज भंडारा बंदची हाक देण्यात आली आहे.
आरोपी अविवाहित आहे
रोहित वासनिक (वय 30) असं या आरोपीचं नाव असून तो अविवाहित आहे. तसेच तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती समोर आली आहे. नराधम रोहित याने चिमुकलीला शौचालयात नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिमुकलीने आरडाओरड केल्यानं परिसरातील नागरिकांच्या ही घटना तत्काळ लक्षात आली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून आरोपी रोहित याला जागेवरच पकडलं आणि संतप्त जमावानं त्याला चांगलाच चोप दिला. जमावाच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात आरोपीनं स्वतःला टाइल्सच्या तुकड्यानं मारहाण करून जखमी करून घेतलं.
Pune Crime : शाळेपासून अफेअर, पुण्यात जाताच निकिता विसरली; संतप्त तरुणाने हिंजवडी गाठली, एक्सच्या प्रियकराला जीवानिशी संपवलं घटनेनंतर पीडित मुलगी आणि जखमी आरोपी या दोघांनाही उपचारासाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच शेकडो भंडारावासी मेडिकल कॉलेज परिसरात जमा झाले. ‘नराधम आरोपीवर उपचार करू नका आणि त्याला तत्काळ नागरिकांच्या स्वाधीन करा,’ अशी आक्रमक भूमिका घेत संतप्त नागरिकांनी थेट रुग्णालयात ठिय्या मांडला. जवळपास 7 तास मेडिकल कॉलेज परिसरात अत्यंत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भंडारा शहरासह पोलीस मुख्यालय, राखीव पोलीस दल आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतून अतिरिक्त पोलीस कुमक तातडीने तैनात करण्यात आली.
भंडारा बंदचं आवाहन
रुग्णालय परिसरातील संतापजनक वातावरण पाहता प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक मोरे, उपविभागीय अधिकारी तिखे आणि मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. दुधगावकर यांनी संतप्त नागरिकांशी सविस्तर चर्चा केली. आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आणि त्याला कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास नागरिकांचा रोष शांत झाला. ‘या दुर्दैवी प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, तसेच आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये’, या मागणीसाठी आज भंडारा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठ आणि दुकानं बंद ठेवण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा