• Fri. Aug 7th, 2026

    Mohan Bhagwat: आंदोलन म्हणजे संवादच! आंदोलकांना देशविरोधी न मानण्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

    Mohan Bhagwat: आंदोलन म्हणजे संवादच! आंदोलकांना देशविरोधी न मानण्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘लोकशाहीत आंदोलन हा संघर्षाचा नव्हे, तर संवादाचा मार्ग आहे. आंदोलनातून सहमती निर्माण झाली पाहिजे; केवळ वादविवाद होऊन उपयोग नाही. आजची तरुणाई व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आवाज उठवत आहे. त्यांच्या तक्रारी खऱ्या आहेत. त्यांना देशविरोधी न मानता, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’, असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी दिला.

    ‘इंडिया इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनाइट नेशन्स’ (आयमन) या संस्थेच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित परिषदेत भागवत यांनी ‘जेन-झी’च्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली.

    Ramesh Mhatre Case: म्हात्रेंना राज्याबाहेर राहण्याची अट? डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी आज जामीन मिळणारया परिषदेला देशभरातील १००हून अधिक शहरांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थी आणि ३००हून अधिक शिक्षक उपस्थित होते. दिल्ली, तमिळनाडू, गुजरातसह विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग घेतला. विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधीही उपस्थित होते. अमृता फडणवीस यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. ‘आयमन’चे संस्थापक ऋषभ शाह यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न भागवत यांच्यासमोर मांडले. जवळपास दीड तास चाललेल्या संवादात विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर भागवत यांनी सविस्तर उत्तरे दिली.

    आजच्या पिढीविषयी बोलताना भागवत म्हणाले, ‘जेन-झी विषयी माझे निरीक्षण सकारात्मक आहे. ही पिढी आमच्या पिढीपेक्षाही अधिक प्रामाणिक आहे. ‘जेन-झी’वर डोळे झाकून विश्वास ठेवायला हरकत नाही. आजचे तरुण उत्तरे शोधत आहेत. त्यांना प्रेम, विश्वास आणि संवाद हवा आहे. ते केवळ विरोधासाठी आवाज उठवत नाहीत; व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रश्न विचारत आहेत.’

    आंदोलनांच्या संदर्भात सरसंघचालकांनी लोकशाहीतील संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘लोकशाहीत आंदोलन हा संवादाचा मार्ग आहे. आंदोलनातून सहमती निर्माण झाली पाहिजे. संवाद थांबला की, संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे तरुणांनी प्रश्न विचारणे आणि मत मांडणे हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे’, असे ते म्हणाले. ‘तरुणांच्या तक्रारी खऱ्या आहेत. त्यांना ‘देशविरोधी’ म्हणून दूर लोटू नये. ते आपलेच आहेत, या भावनेतून त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’, असेही भागवत यांनी नमूद केले.

    Maharashtra TimesShiv Sena Case : राजकीय पक्षाला कुणी डावलू शकत नाही, शिवसेनेच्या सुनावणीतला कळीचा मुद्दा
    शिक्षणासाठी व्यवस्था हवी…

    बेरोजगारीबाबत भागवत यांनी रोजगाराची व्यापक व्याख्या मांडली. ‘रोजगार म्हणजे केवळ नोकरी नव्हे. उद्योजकता, कौशल्य आणि श्रमप्रतिष्ठेला तितकेच महत्त्व आहे. तरुणांनी कौशल्याधारित संधी शोधल्या पाहिजेत. रोजगारनिर्मितीकडे व्यापक दृष्टीने पाहण्याची गरज आहे’, असे त्यांनी सांगितले.

    ‘जेन-झी’ विषयी माझे निरीक्षण सकारात्मक आहे. ही पिढी आमच्या पिढीपेक्षाही अधिक प्रामाणिक आहे. त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला हरकत नाही. आजचे तरुण केवळ विरोधासाठी आवाज उठवत नाहीत; व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रश्न विचारत आहेत.-सरसंघचालक मोहन भागवत

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed