Vanaz to Chandani Chowk Metro: पुण्यात पश्चिम भागाती रहिवाशांना मेट्रो लिंक मिळेल यासाठी पावले उचलली जात आहेत. वनाझ ते चांदणी चौक मेट्रोचा विस्तार होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: पुण्यातील अक्वा लाइन म्हणजेच, मेट्रो लाइन 2चा विस्तार सुरू झाला आहे. वनाझ ते रामवाडीपर्यंत धावणारी ही मार्गिका आता वनाझ ते चांदणी चौकापर्यंत धावणार आहे. यामुळे पुण्यातील पश्चिम उपनगरातील प्रवास सोपा होणार आहे. या मार्गिकेच्या विस्ताराला गेल्या वर्षीच मंजुरी मिळाली होती. पण आता अखेर या मार्गिकेचं काम सुरू झालं आहे.
कसा असेल मार्ग?
मेट्रो लाइन 2 या उन्नत मार्गाचा 1.5 किमी विस्तार करण्यात येणार आहे. वनाझ ते चांदणी चौकापर्यंत दोन नव्या स्थानकांचा समावेश करण्यात येणार आहे. कोथरूड डेपो आणि चांदणी चौक अशी ही दोन स्थानकं असतील. यामुळे पुणे शहरातील एन्ट्री असणाऱ्या भागांत मेट्रो स्थानक बनणार आहे. वाहतुकीवर कमीतकमी परिणाम होण्यासाठी या मार्गिकेचं काम टप्प्या-टप्प्याने होणार आहे. वाहतूक पोलिसांसोबत मिळून मार्गावर बॅरिकेड लावण्यास तयारी सुरू झाली आहे. रस्त्यावर वाहनांना जास्तीत-जास्त जागा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उड्डाणपूल कुठे असेल?
या मार्गिकेसाठी व्हायाडक्ट आणि स्थानकं बांधण्यासाठी नुक्तीच एका सल्लागाराची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या मेट्रो मार्गिकेच्या शेजारीच कोथरूड डेपो जवळ एक उड्डाणपूल उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेच्या काही अधिकार्यांनी गेल्या काही महिन्यात जागा ठरवली आहे. कुठून-कुठपर्यंत मार्ग तयार करण्यात येईल हे यावेळी ठरवण्यात आलं होतं.
पादचारी पूल
चांदणी चौक जवळ बांधकामाला सुरूवात झाली आहे. मातीचे परीक्षण आणि सर्वेक्षण सुरू झाले आहे. तसेच, वनाझ डेपो जवळील व्हायाडक्ट वाढवण्याचं काम झालं आहे. इथून पुढे चांदणी चौकाच्या दिशेने पुढील बांधकाम सुरू होणार आहे. दरम्यान, चांदणी चौक स्थानकाजवळ प्रवाशांसाठी एका पादचारी पुलाचाही योजना आहे. कोंडी असलेल्या महामार्गावरून स्थानकाजवळ सहजपणे पोहोचवण्यासाठी हा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.
या विस्तारीकरणामुळे पुणे पश्चिमेतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. चांदणी चौकात मेट्रो लिंक नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय व्हायची. नागरिकांना वनाझ स्थानक जवळ पडायचं पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी इतर वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून रहावं लागायचं. पण आता या विस्तारामुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुलभ होणार आहे. प्रवाशांना लास्ट माइल कनेकटीव्हीटी मिळणार असून या परिसरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा