• Sun. Jun 14th, 2026

    Pune Ring Road: पुण्यात दुहेरी रिंग रोडचे जाळे, अंतर्गत आणि बाह्य मार्गामुळे कोंडी फुटणार; कसे-कुठून जोडणार?

    Pune Ring Road: पुण्यात दुहेरी रिंग रोडचे जाळे, अंतर्गत आणि बाह्य मार्गामुळे कोंडी फुटणार; कसे-कुठून जोडणार?

    PMRDA Ring Road: पुण्यात सध्या बाह्य रिंग रोडचं काम सुरू असतनाच पीएमआरडीएच्या अंतर्गत रिंग रोडलाही गती मिळाली आहे. 3 गावांमधील जमिनीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: पुण्यात रिंग रोडच्या कामांना वेग मिळाला आहे. पीएमआरडीएने काही गावांमधील जमिनीचे दर अखेर निश्चित केले आहेत. तसेच, जिल्हा प्रशासनाने भूसंपदानाचा प्रस्तावही सादर केला आहे. या प्रकल्पाती प्रमुख पायाभूत सुविधांचा या अहवालात आराखडा सादर केला गेला आहे.

    कसा असेल पहिला टप्पा?

    पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे रिंग रोड चा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा अंतर्गत पुणे रिंग रोड 83 किमी लांब असणार आहे. तसेच, या मार्गाची रुंदी 65 मीटर असेल. या प्रकल्पासाठी एकूण 700 ते 750 मीटर जमीन आवश्यक आहे. या मार्गावरील तीन गावांमध्ये जमिनीची किंमत निश्चित करण्यात आली आहे. पुण्यातील सोलू, वडगाव शिंदे आणि निरगुडे या गावांमधील जमिनीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यातील काम वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.

    कोणत्या गावांचा समावेश?

    मंजूर आकडेवारीनुसार, सोलूमध्ये सुमारे 34.65 हेक्टर, वडगाव शिंदे येथे 5.71 हेक्टर आणि निरगुडे येथे 1.44 हेक्टर जमीन सुरुवातीला संपादित केली जाण्याची अपेक्षा आहे. जमीन मालकांना अंतिम चौकटीनुसार थेट रोख देयक किंवा ‘टीडीआर’द्वारे नुकसान भरपाई मिळू शकते. या संपूर्ण प्रकल्पासाठी पुण्यातील 11 गावांमधील सुमारे 92.25 हेक्टर जमीन संपादित केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जिल्ह्यातील आंबेगाव, पिसोळी, वाडाचीवाडी, कदमवाक वस्ती, कोळवाडी, जांभूळवाडी, मांजरी खुर्द, भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी आणि येवेलेवाडी या गावांचा समावेश आहे.

    दुहेरी रिंग रोड प्रकल्प

    पीएमआरडीचा रिंग रोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बाह्य रिंग रोडला सोलू येथून जोडणार आहे. यामुळे बाह्य रिंग रोड आणि इनर रिंग रोड एकमेकांशी जोडले जाणार असून पुण्यातील गावांची जिल्ह्याबाहेर कनेकटीव्हीटी वाढणार आहे. सध्या बाह्य रिंग रोडचे सुमारे 30 टक्के काम पूर्ण झालं असून प्रगती सुरू आहे.

    पुण्यातील या दुहेरी रिंग रोडच्या नेटवर्कमुळे अवजड वाहनांची वाहतूक शहरातील मार्गांपासून पुढे वळवण्यात यश मिळणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या दुहेरी रिंग रोडच्या मार्गांच्या सहाय्याने पुण्याहून थेट बाहेर पोहोचता येणार आहे. अनेक वर्षांच्या विलंबानंतर पीएमआरडीएच्या अंतर्गत रिंग रोडच्या कामाला वेग मिळाला आहे. आता एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.

    संपूर्ण पुणे रिंग रोड 173 किमी लांब असून यामध्ये 29 गावांचा समावेश असेल. शहरातील सर्व महामार्गांना हा रिंग रोड जोडणार आहे.सर्व प्रथम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 2007मध्ये पुणे शहरात रिंग रोड तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यातील पहिल्या टप्प्यातील काम सुरू होण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा