• Sat. Jun 20th, 2026
    Marathi Compulsion : ‘मराठी माणसाला त्रास दिला तर तुमचे गाल अन् आमचे हात’, मनसेचा कल्याणमध्ये इशारा

    येत्या 1 मे पासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेत संभाषण करणं सक्तीचं होणार आहे. पण सरकारच्या या निर्णयाला काही अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी विरोध केला आहे. यावरुन मनसेने मोठा इशारा दिला आहे. मनसेने राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसेच या निर्णयाविरोधात संपावर जाणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी चालकांना त्रास दिला तर तुमचे गाल आणि आमचे हात असतील, असा इशारा मनसेने दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : राज्य सरकारने राज्यातील मराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेत संभाषण करणं अनिवार्य केलं आहे. रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता आली नाही तर त्यांचा थेट परवाना रद्द करण्याची कारवाई होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक हे आक्रमक झाले आहेत. जवळपास 15 लाख रिक्षा आणि टॅक्सी चालक हे 4 मे पासून या निर्णयाविरोधात संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. यावर आता मनसेकडून आक्रमक प्रतिक्रिया आली आहे. “मराठी माणसाला त्रास दिला तर तुमचे गाल अन् आमचा हात”, असा इशारा कल्याणमध्ये मनसेकडून देण्यात आला आहे. कल्याणमध्ये मनसेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी हा इशारा दिला आहे.

    उल्हास भोईर नेमकं काय म्हणाले?

    “रिक्षा चार-साडेचार लाख आहेत. यांचं ज्ञान कमी आहे. मग हे युपी-बिहार येथून भैय्या लोकं घेऊन येणार आहेत का? आम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी ठाम आहोत. त्यांनी येत्या 4 तारखेला संप पुकारला आणि आमच्या मराठी रिक्षा चालकाला त्रास दिला तर त्यांना भारी पडेल”, असं उल्हास भोईर म्हणाले.”आम्ही तुम्हाला माहिती आहे. आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो. जसा आमच्या जाधव साहेबांनी सांगितलं होतं की, अन्याय होत असेल तर आमचा हात आणि त्यांचा गाल. तसेच मराठी माणसावर अन्याय होत असेल तर आमचा हात आणि त्यांचा गाल हे ब्रीदवाक्य दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत”, असादेखील इशारा उल्हास भोईर यांनी दिला. ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेवेळी त्यांनी हा इशारा दिला.

    मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेला मनसेचा पाठिंबा

    राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी विरोध केला आहे. पण प्रताप सरनाईक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणं अनिवार्य आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय निरुपण यांनी प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर दुसरीकडे मनसेकडून प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.

    संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे आक्रमक

    संजय निरुपम यांनी दहिसरमध्ये अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबत संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी दाखल होत संजय निरुपम यांना विरोध केला. यावेळी शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. विशेष म्हणजे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकडदेखील केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा