Amravati Girls Assault Case : अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील नागपूर येथील एका पीडितेने एसआयटीसमोर साक्ष दिल्यानंतर दोन दिवसांनी, आणखी एका पीडितेची आई पुढे आली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याचे साथीदार उजैर खान इक्बाल खान, महंमद साद, महंमद साबीर आणि तरबेज खान तसलीम खान या चौघांच्या कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर अचलपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सरकारी वकील डी. ए. नवले यांनी न्यायालयाकडे कोठडी वाढीची मागणी केली. ‘या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संशयास्पद बँक खाती आणि पीडितांच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीचे धागेदोरे उलगडणे गरजेचे आहे,’ असे पोलिस निरीक्षक सुरेश मस्के यांनी न्यायालयाला सांगितले.
रॅकेटमधील बड्या दुव्यांचा शोध
‘या रॅकेटमधील बड्या दुव्यांचा शोध घेण्यासाठी आणि अन्य आरोपींची ओळख पटवण्यासाठी या चौघांची सखोल चौकशी करणे अनिवार्य आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ पीडित तरुणी समोर आल्या आहेत. आरोपींकडून जप्त केलेल्या उपकरणांतून १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो असा आक्षेपार्ह मजकुराचा खच पोलिसांच्या हाती लागला आहे.
न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या मोबाइल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्कच्या अहवालानंतर या प्रकरणातील गुन्हेगारीचे क्रूर वास्तव अधिक स्पष्ट होणार आहे,’ असे ते म्हणाले. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता आरोपींची ने-आण करताना; तसेच सुनावणीदरम्यान न्यायालय परिसरासह अचलपूर-परतवाडा शहरातील काही भागांत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
धक्कादायक खुलासे होणार?
न्या. सागर पाटील यांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथकाला कडक सूचना दिल्या. आरोपींना पुन्हा कोठडीत पाठविण्यात आल्यानंतर येणाऱ्या काही दिवसांत या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणातील प्रत्येक आरोपीला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली आहे.
अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील नागपूर येथील एका पीडितेने एसआयटीसमोर साक्ष दिल्यानंतर दोन दिवसांनी, सोमवारी आणखी एका पीडितेची आई पुढे आली. तिने अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील दुसरा आरोपी उजैर खान याच्याविरुद्ध पोलिसांनी ‘एफआयआर’ दाखल केला आहे. १६ वर्षीय मुलीचा पाठलाग केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.
एकूण गुन्ह्यांची संख्या तीनवर
आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करुन ते ऑनलाईन व्हायरल झाल्याच्या प्रकरणात ओळख पटलेल्या आठ पीडितांमध्ये ही मुलगी नव्हती. या नवीन एफआयआरमुळे, या प्रकरणात आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे. यापैकी दोन गुन्हे उजैर खानविरुद्ध, तर एक गुन्हा मुख्य आरोपी अयान अहमदविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा