शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांत मंडप, रोषणाई आणि सजावटीवर अंतिम हात फिरविण्याची लगबग रविवारी दिवसभर सुरू होती. चितारओळीसह शहरातील विविध भागांत गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सकाळपासूनच चितारओळीत भाविकांची गर्दी उसळली होती. मार्ग बंद न केल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मिळेल त्या जागी विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे मोठ्या मूर्ती बाहेर काढताना मंडळांच्या कार्यकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
Maharashtra FDA: वर्षभर नव्हे, आता अहवाल 14 दिवसांत; शिफ्टमध्ये काम, एफडीएचा कारवायांचा धडाकामहाल परिसरात दिवसभर भाविकांची वर्दळ होती. घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीही रविवारी नेण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर रात्री उशिरापर्यंत गजबजलेला होता. आज सकाळपासून प्रतिष्ठापना होणार असल्याने रविवारी अनेकांनी वाजतगाजत गणेशमूर्ती घरी व मंडळांत नेल्या. नागपूरबाहेरील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही चितारओळीत मूर्ती घेण्यासाठी गर्दी केली होती. सेंट्रल ॲव्हेन्यूवर मूर्ती नेण्यासाठी आलेल्या चारचाकी वाहनांच्या रांगा सकाळपासून दिसून येत होत्या.
पावसाने दिलासा दिला
सकाळी झालेल्या पावसामुळे विक्रेते, दुकानदार, मूर्तिकार आणि भाविकांची काहीशी तारांबळ उडाली. मात्र, दुपारी पावसाने उसंत घेताच चितारओळ तसेच शहरातील बाजारपेठांमध्ये पुन्हा गर्दी वाढली. यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने प्रथम हरतालिकेची पूजा आणि त्यानंतर गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे रविवारी भाविकांनी दोन्ही पूजांसाठी लागणारे साहित्य खरेदी करून घेतले.
Nagpur News : 2019 मध्ये मुलगा गेला, पित्याला सूनेवर जादूटोण्याचा संशय, वादाने टोक गाठलं, नागपुरात मन सुन्न करणारी घटनारविवार सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी सकाळपासून घराची स्वच्छता, सजावट आणि डेकोरेशन पूर्ण केले. सायंकाळी गणेशमूर्ती व पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांकडे नोकरदारांचा मोठा कल दिसून आला. एकूणच लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी नागपूरकर सज्ज झाले असून, आजपासून सुरू होणाऱ्या मंगलमय सोहळ्याने शहरात भक्ती आणि उत्साहाची पाखरण होणार आहे.
महालातील संती गणेशोत्सव मंडळासह शहरातील विविध भागांतील गणेशमूर्ती ढोल-ताशांच्या निनादात शनिवारी दुपारी चितारओळीतून नेण्यात आल्या. रेशीमबागेतील ‘नागपूरचा राजा’चे आगमन रविवारी झाले. हिलटॉप येथील आमदार प्रकाश गजभिये यांच्या मंडळाद्वारे बसविण्यात येणाऱ्या सर्वांत उंच गणपतीची मिरवणूक आज, सोमवारी चितारओळीतून निघणार आहे.
Nagpur News : हायकोर्टाचे विश्वास नांगरे पाटील यांना महत्त्वाचे निर्देश, डीजे प्रकरणावर कोर्टात काय-काय युक्तिवाद?छोटे दुकानदार, विक्रेते आनंदी
पूजेसाठी लागणारी फुले, केवड्याची पाने, कमळ, दूर्वा, तुळस, पत्री तसेच सजावटीच्या साहित्याला चांगली मागणी आहे. प्रसादासाठी पेढे, मोदक यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. विड्याची पाने, आघाडा-केना, कमळाची फुले, केळीचे खांब, काकडी, कणीस विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सव आणि ज्येष्ठ गौरी आगमनामुळे पुढील काही दिवस या विक्रेत्यांसाठी व्यावसायिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहेत.
