Chhatrapati sambhajinagar: मित्रपक्षांचे आमदार असणाऱ्या मतदारसंघात भाजपने आपले दिग्गज नेते प्रभारी म्हणून नेमल्याने भाजपकडून ही स्वबळाची तयारी सुरू आहे का, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपने मित्रपक्षांची डोकेदुखी वाढवली; शिंदे अन् पवारांच्या आमदारांच्या मतदारसंघात बड्या नेत्यांवर जबाबदारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा प्रभारींची जी नवी यादी जाहीर केली आहे, त्याने महायुतीतल्या मित्रपक्षांची झोप उडवली आहे. कारण भाजपने चक्क उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत, तिथे आपले मोठे नेते प्रभारी म्हणून पाठवले आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत अद्याप मोठा अवधी असला तरी भाजपने आपली ताकद दाखवायला सुरुवात केल्याची चर्चा रंगू लागली असून भाजपने स्वबळाच्या दृष्टीने टाकलेलं हे पहिलं पाऊल असल्याचं बोललं जात आहे.
शिरसाटांच्या मतदारसंघात प्रीतम मुंडे
भाजपकडून घेण्यात आलेल्या नव्या निर्णयामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाची. हा मतदारसंघ सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्याकडे आहे. पण भाजपने तिथे प्रभारी म्हणून थेट प्रीतम मुंडे यांची नियुक्ती केली आहे. पंकजा मुंडे लोकसभेला पराभूत झाल्यानंतर आता त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना थेट शिरसाटांच्या मतदारसंघात पाठवणे, हा भाजपचा चेकमेट प्लॅन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.
मिशन ८ आणि नेत्यांची फौज
भाजपने संपूर्ण मराठवाड्यासाठी मिशन ८ ची आखणी केली आहे. यात मोठ्या नेत्यांना टार्गेट दिलं असून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना लातूरला पाठवलं आहे, तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आहे. तर राहुल लोणीकर यांना संभाजीनगर ग्रामीणची जबाबदारी दिली आहे .तसेच चैतन्य बापू देशमुख यांच्याकडे शहराची सूत्रे दिली आहेत.
जागावाटपात अडचण येणार?
साधारणपणे असं ठरलेलं असतं की ज्याची जागा त्यालाच मिळावी. पण भाजपने ज्या ठिकाणी मित्रपक्षांचे आमदार आहेत, तिथे आपले दिग्गज नेते प्रभारी म्हणून नेमल्यामुळे जागावाटपावेळी पेच निर्माण होणार की भाजपकडून ही स्वबळाची तयारी सुरू आहे, अशी कुजबूज रंगत आहे.
दरम्यान, निवडणुकीपूर्वीच भाजपने सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. एकूणच काय तर, ही केवळ पक्षबांधणी नसून मित्रपक्षांना दबावात ठेवण्यासाठी केलेली ही रणनीती असल्याचा आरोप होऊ लागला आहे. ज्या ठिकाणी मित्रपक्ष कमजोर असेल तिथे भाजप आपला उमेदवार घुसवण्याच्या तयारीत असल्याचं या नियुक्त्यांवरून दिसत आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा