Nashik Rain Alert: सकाळी साडेआठ ते रविवारी सकाळी साडेआठ या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११.२ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने रविवारी जिल्ह्यासाठी ‘यलो’, तर घाटमाथ्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. शनिवारी दिवसभर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.
Nashik Crime : देशसेवेच्या स्वप्नाने सैन्यात भरती, २० वर्षीय प्रशिक्षणार्थी अग्निवीराने अकस्मात आयुष्य संपवलं, नाशकात खळबळसुरगाणा तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. येथे सर्वाधिक ३९.१ मिमी पाऊस नोंदविला गेला. दिंडोरीत २९.१ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये २४.९ मिमी, पेठमध्ये १५.६ मिमी, कळवणमध्ये १५.४ मिमी, तर बागलाणमध्ये ११.३ मिमी पाऊस झाला. नाशिक तालुक्यातही १३.१ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम होता.
शहरात १६.८ मिमी पाऊस
नाशिक शहरात रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत १६.८ मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी सायंकाळी उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला होता. पहाटेही पाऊस झाल्याने अनेक दिवसांनंतर शहरात तुलनेने चांगला पाऊस नोंदविला गेला.
मुंबईची वाट खडतर,मराठा समन्वयक जरांगेंच्या विरोधात | Manoj Jarange Vs Nashik Maratha Andolak
रविवारी ‘यलो अलर्ट’ असला, तरी शनिवारच्या तुलनेत पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभर पावसाची भुरभुर सुरू असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात आणखी १.१ मिमी पावसाची नोंद झाली.
तालुकानिहाय पाऊस (मिमीमध्ये)
- सुरगाणा 39.1
- दिंडोरी 29.1
- त्र्यंबकेश्वर 24.9
- पेठ 15.6
- कळवण 15.4
- नाशिक 13.1
- बागलाण 11.3
- निफाड 9.8
- इगतपुरी 8.4
- सिन्नर 6.5
- चांदवड 6.5
- देवळा 5.6
- येवला 0.9
- नांदगाव 0.7
- मालेगाव 0.2
