Navi Mumbai Bribe Case: नवी मुंबई महापालिकेत ४२ हजारांची लाच स्विकारताना उपायुक्त कैलास गायकवाड यांना मंगळवारी सायंकाळी अटक केली.
कंत्राटदार दशरथ सुरवसे हे महापालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईसाठी आवश्यक असलेली वाहने पुरवितात. सुरवसे यांनी १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ऐरोली विभागात अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी वाहने पुरवली होती. या कामाचा मोबदला मिळावा म्हणून ते प्रयत्नशील होते. मात्र, हे देयक मंजूर करण्यासाठी गायकवाड यांनी ४२ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. सुरवसे यांनी याबाबत एसीबीच्या नवी मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली होती. एसीबीने मंगळवारी सायंकाळी सीबीडी येथील महापालिका मुख्यालयात सापळा लावला. गायकवाड यांनी सुरवसे यांच्याकडून ४२ हजार रुपये स्वीकारल्यानंतर एसीबीने गायकवाड यांना पकडले.
Mumbai Local: चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल आमनेसामने; CSMT स्थानकात गोंधळ, अनर्थ टळला, स्टेशन मास्तर निलंबित
७ लाखांची लाच घेताना एकजण जाळ्यात
वसई : वसई येथील अपर तहसीलदार (अकृषिक) कार्यालयातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचून मोठी कारवाई केली. अनधिकृत बांधकाम पाडू नये यासाठी ७ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला पकडण्यात आले. या प्रकरणात अपर तहसीलदार विनोद धोत्रे यांचा सहभाग आढळला असून, ते फरार झाले आहेत. तक्रारदार यांची वसई पूर्वेकडील देपिवली येथे जागा आहे. या जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडू नये आणि ही जागा अकृषिक करून देण्यासाठी सुरुवातीला ४० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
Weather Updates: पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल! कुठे उष्णतेची लाट, तर कुठे गारपीट; IMDकडून 13 राज्यांना अलर्ट जारी
केवळ अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी झाली, मात्र तडजोडीअंती ७ लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. मंगळवारी पथकाने सापळा रचला. अपर तहसीलदार कार्यालयाशी संबंधित अनिल चौबल याला ७ लाख रुपये स्वीकारताना पथकाने पकडले
