• Sat. Jun 6th, 2026
    Navi Mumbai Crime : जुन्या वादाची ठिणगी मनात होती, वाढदिवसाची पार्टी सुरु असतानाच पाच जणांची बेदम मारहाण, सोनराजने जागीच जीव सोडला

    Youth killed in digha navi mumbai : दिघा परिसरात वाढदिवस साजरा करताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले आहे. जुन्या वैमनस्यातून एका ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून, रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    नवी मुंबई दिघा परिसरात वाढदिवसाच्या पार्टीत तरुणाचा खून(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, नवी मुंबई : दिघा परिसरात वाढदिवस साजरा करताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाचा दगडाने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत पाच आरोपींना अटक केली आहे. पंढरीनगर परिसरातील काही मित्र १३ एप्रिल रोजी पहाटे साडेदोनच्या सुमारास वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी दारूच्या नशेत जुन्या कारणावरून दोन मित्रांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद चिघळत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

    संतापाच्या भरात आरोपींनी संगनमत करून सोनराज सुरेश शिंदे (वय ३०) यांना घेराव घालत प्रथम हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मुख्य आरोपी कुणाल उर्फ घनश्याम चौधरी (वय २३) याने दगडाने डोक्यात व ओटीपोटावर प्रहार केला. त्यानंतर इतर आरोपी कुणाल राठोड (२२), वैभव मोरे (२४), महिंद्र नारायणकर (२४) आणि आकाश लाड (२२) यांनीही दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले.

    Maharashtra TimesCrime News : पोटच्या अल्पवयीन लेकीला ऊसतोडणीला नेऊन नराधम पित्याचा वारंवार अत्याचार; हॉटेल चालकाचाही वासनांध प्रताप, अहिल्यानगरमधील गंभीर प्रकरण

    या हल्ल्यात शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फिर्यादी आकाश भास्कर पाईकराव (वय ३०) यांनाही आरोपींनी मारहाण केली.

    घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जलद हालचाली करत सर्व पाच आरोपींना अटक केली. “जुन्या वादातून ही घटना घडली असून सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे,” असे तपासी अधिकारी सुनील वाघमारे यांनी आज सांगितले.

    दरम्यान, घटनास्थळी पंकज डहाणे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, वाशी), राहुल धस (सहायक पोलीस आयुक्त, रबाळे विभाग), सुनील वाघमारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), संजय गळवे, हेमराज साठे, दत्तात्रय पवार (सहायक पोलीस निरीक्षक) तसेच आकाश पाटील (पोलीस उपनिरीक्षक) यांनी भेट देऊन पाहणी केली.
    या प्रकरणी बीएनएस कलम १०३ (२), ११५ (२) तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा