• Sat. Sep 5th, 2026

KDMC Hospitals: कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट करण्यात आले. मात्र यातील त्रुटी अजूनही दूर करण्यात आलेल्या नाहीत. अमरावती दुर्घटेनेचे ज्वलंत उदाहरण समोर असताना देखील रुग्णालये अजून असुरक्षितच आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. वृत्तसेवा,कल्याण :अमरावती रुग्णालय दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांचे अग्निशमन विभागाकडून फायर ऑडिट करण्यात आले. मात्र, या अहवालात नोंदवण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.

अद्याप कार्यवाही नाही

महापालिकेच्या वसंत व्हॅली प्रसूतिगृहात अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र जिन्याची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याखेरीज रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयांतही काही आवश्यक बदल करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मात्र, सहा महिने उलटले तरी अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दररोज १५ ते २० महिला प्रसूतीसाठी दाखल

कल्याण-डोंबिवलीमहापालिकेची रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर, गीता हरकिसनदास, वसंत व्हॅली आणि शक्तिधाम अशी पाच रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत मोठ्या आजारांवर उपचार होत नसले तरी दररोज किमान १५ ते २० महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. नवजात बाळे, बाळंतिणी तसेच त्यांचे नातेवाईक यांचा या रुग्णालयांत राबता असतो.

ऑडिट अहवाल बांधकाम विभागाकडे

अमरावतीत प्रसूतिगृहात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच रुग्णालयांच्या फायर ऑडिटची चर्चा सुरू झाली आहे .दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वच छोट्या-मोठ्या रुग्णालयांचे ऑडिट मार्च महिन्यात अग्निशमनविभागाकडून करण्यात आले आहे. या ऑडिटमध्ये काही महत्त्वाचे, तर काही किरकोळ बदल सुचवण्यात आले आहेत. हे बदल पालिकेच्या बांधकाम विभागाकडून केले जाणे अपेक्षित असल्याने ऑडिट अहवाल बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला चार महिने उलटून गेले आहेत.

Maharashtra TimesKasara News: कसारा फास्ट लोकल दिवसभरात अवघ्या ११; मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांचे हाल

संबंधित विभागांना सूचना

या रुग्णालयांतील विद्युत यंत्रणेतही काही बदल सुचवण्यात आले होते. हे बदल विद्युत विभागाकडून करण्यात आले असून, रुग्णालयांतील अंतर्गत वायरिंग दुरुस्तीचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. याबाबत विचारणा केली असता उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, ऑडिट अहवालातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकाम विभागाकडून लवकरात लवकर त्रुटींची पूर्तता केली जाणार असून, विभागाने रुग्णालयांची पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा