• Sun. Jun 14th, 2026
    नवऱ्याशी भांडून माहेरी, रीलस्टार सोनाली जाधवचा अनैतिक संबंधातून घात, वाढदिवसालाच प्रियकराने जीव घेतला

    Pandharpur Reel Star Sonali Jadhav Murder : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील सोनाली जाधव हिची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले

    सोनाली जाधव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अरुण बाबर, पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील महिलेची बॉडी कालव्यात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. इन्स्टाग्राम सोशल मीडियावरील रील स्टार असणाऱ्या ३४ वर्षीय सोनाली जाधव हिचा खून झाला होता. अनैतिक संबंधातून प्रियकरानेच तिचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे ऐन वाढदिवशीच तिचा मृत्यू झाल्याचं समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात होती.

    सोनाली जाधव सोशल मीडियावर रील व्हिडीओ तयार करुन फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झाली होती. तिचा विवाह झाला होता, परंतु काही कौटुंबिक कारणामुळे ती आपल्या पतीपासून वेगळी होऊन माहेरी राहत होती.

    गावातील तरुणाशी प्रेमसंबंध

    सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील सोनाली जाधव हिची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. सोनाली जाधव हिचा विवाह झाला होता, मात्र ती सध्या तिच्या माहेरी भोसे येथे राहत होती. भोसे येथे राहत असताना गावातील तुकाराम उर्फ बुवा वामन गावांधरे नामक तरुणाशी तिचे प्रेम संबंध जुळून आले होते.
    Maharashtra TimesNashik Crime : आमची मुलं दोषी असतील, तर खुशाल फाशी द्या; पण धार्मिक द्वेष नको, नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या पालकांचा संताप
    सुरुवातीला झालेली ओळख काही दिवसातच मैत्रीत बदलली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात व्हायला वेळ लागला नाही. मात्र या प्रेमसंबंधातून अल्पावधीतच वादही उद्भवले. प्रियकर तुकारामला सोनालीच्या चारित्र्याचा वारंवार संशय येत होता. तिचे अन्य एका व्यक्तीसोबत बोलणं किंवा फिरणं सुरु असल्याचं त्याला सतत वाटत असे. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटकेही उडत असत.

    Nitin Raut | नागपुरात स्वीकृत सदस्य निवडीवरून राजकारण, नितीन राऊतांचे गंभीर आरोप

    वाढदिवशी भेटून गळा दाबला

    वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देतो, असं आमिष दाखवून तुकारामने सोनालीला बोलावलं. तिला आपल्या बाईकवर बसवून सोबत नेलं. निर्जन ठिकाणी गेल्यानंतर झालेल्या वादातून तुकारामने सोनालीचा गळा दाबल्याचा आरोप आहे. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोनालीला त्याने रोपळे परिसरातील उजनी कालव्यात फेकून दिल्याची माहिती आहे.
    Maharashtra TimesAmravati Crime : पहिल्या ब्रेकअपमुळे प्लेबॉय बनलो; 180 मुलींचं शोषण करणाऱ्या अयानची निर्लज्ज कबुली, स्टोरी ऐकून पोलीस चक्रावले

    कुजलेली बॉडी सापडली

    दोन दिवस उलटूनही सोनाली घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांनी करकंब पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तुकारामला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. कालव्यातून कुजलेल्या अवस्थेतील बॉडी बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी कपडे आणि अंगावरील दागिन्यांवरून ओळख पटवत ती बॉडी सोनालीचीच असल्याचं निष्पन्न झालं. रीलस्टारच्या मृत्यूमुळे सोनाली जाधवचे चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा