• Sat. Jun 6th, 2026

    18-19 वर्षांच्या मुली यायच्या; रात्री लेटपर्यंत थांबायच्या! अमरावतीच्या बिल्डींगमधला शेजारी समोर

    18-19 वर्षांच्या मुली यायच्या; रात्री लेटपर्यंत थांबायच्या! अमरावतीच्या बिल्डींगमधला शेजारी समोर

    Amravati Crime: अमरावतीमधील व्हिडीओ स्कँडल राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. ज्या फ्लॅटमध्ये मुलींचं शोषण झालं, त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले, त्याच इमारतीमधला एक जण आता समोर आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमरावती: अमरावतीमधील परतवाड्यातील व्हिडीओ स्कँडल प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासातून दररोज नवी माहिती समोर येत आहे. या सगळ्या प्रकरणाचं केंद्रस्थान अमरावती शहरातील कटोरा नाका परिसरात असलेली कमल रेसिडेन्सीतील एक फ्लॅट होता. याच ठिकाणी आरोपी अयाननं अनेक मुलींसोबत शोषण केलं. मग त्यांना आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओंच्या आधारे ब्लॅकमेल केलं. असा प्रकार १८० मुलींसोबत घडला.

    स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या फ्लॅटमध्ये हा सगळा प्रकार घडला, तो फ्लॅट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. ‘इथे अयान मुलींना घेऊन यायचा. दिवस-रात्र त्याच्या फेऱ्या व्हायच्या,’ अशी माहिती स्थानिकांनी दिली. याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका फ्लॅट मालकानं याबद्दल बरीच सविस्तर माहिती दिली. ‘त्या फ्लॅटवर बऱ्याचदा १८-१९ वर्षांच्या मुली यायच्या. त्या रात्री उशिरापर्यंत थांबायच्या. आम्हाला याबद्दल संशय आला. आम्ही फ्लॅट मालकिणीला कळवलं. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं,’ असं याच इमारतीमधील एका फ्लॅट मालकानं सांगितलं.
    Maharashtra TimesAmravati Crime : अमरावतीतील परतवाडा आक्षेपार्ह व्हिडिओ फाइल्स प्रकरण; आरोपींची संख्या वाढली, फॉरवर्ड करणाऱ्यांचा शोध सुरु
    ‘फ्लॅटमध्ये येणाऱ्या तरुणी त्यांची ओळख पटू नये यासाठी कधी बुर्का, तर कधी ओढणीचा वापर करायच्या. त्या चेहरा झाकून यायच्या. त्यामुळे त्यांची ओळख पटायची नाही. काही दिवसांपूर्वीच पोलीस या फ्लॅटकडे आले होते. पण ते येण्याआधीच इथे राहणारा मानव नावाचा तरुण कुलूप लावून फरार झाला,’ अशी माहिती फ्लॅट मालकानं दिली.

    हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिकांमध्ये नाराजी आहे. अशी कृत्यं करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या फ्लॅट मालकानं केली. फ्लॅट मालकालादेखील आरोपी करायला हवं. त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल व्हायला हवा. कारण याबद्दल त्यांना वारंवार सांगूनही त्यांनी काहीच केलं नाही. त्यामुळे फ्लॅट मालकाचाही यात सहभागी असण्याची शंका दुसऱ्या मजल्यावरील मालकानं बोलून दाखवली.
    Maharashtra TimesAmravati Crime : कोण जास्त मुली पटवणार, अयान-उझरमध्ये पैज, पण पैशातून वाद; रागात मित्राचे 18 आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड अन् अमरावती प्रकरणावरील पडदा दूर
    ‘अशा प्रकारच्या घटनांमुळे एका चांगल्या सोसायटीतील वातावरण खराब होतं. यामुळे मुलांच्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे,’ अशी भीती फ्लॅट मालकानं व्यक्त केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी संबंधित फ्लॅट सील केला आहे. या संपूर्ण व्हिडीओ स्कँडलमध्ये या फ्लॅटची भूमिका महत्त्वाची आहे. अयाननं शूट केलेले बहुतांश व्हिडीओ याच फ्लॅटमधील आहेत.

    या प्रकरणात अमरावती ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अयान अहमद, उजैर खान, मोहम्मद साद आणि तबरेज खान अशी त्यांची नावं आहेत. शहरातील भाड्याच्या घरात तरुणींना बोलावून त्यांचं शोषण केल्याचा आणि त्यांचे व्हिडीओ तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आतापर्यंत ८ पीडितांची ओळख पटली आहे. अन्य पीडितांचा शोध सुरु आहे. प्रकरणाचं गांभीर्य पाहता ४७ सदस्यांचं विशेष तपास पथक करण्यात आलं आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा