• Sat. Jun 6th, 2026
    खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, समृद्धी हायवेवर कार कंटेनरखाली घुसली

    Shivnika Trust VP Dies on Samruddhi Expressway Accident : अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. समृद्धी महामार्गावर उभ्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्यानंतर त्यांची कार थेट कंटेनरखाली घुसली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबिन खान, अहिल्यानगर : स्वतःला ‘कॅप्टन’ तसेच राजकीय ज्योतिषी म्हणवून घेणारा भोंदू आणि महिला अत्याचार प्रकरणातील प्रमुख संशयित अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शेळकेंना प्राण गमवावे लागले. अपघातात Jitendra Shelke यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी आहेत. जितेंद्र शेळके हे अशोक खरातचे निकटवर्तीय मानले जात.

    समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

    समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला. उभ्या कंटेनरला कारने पाठीमागून धडक दिल्यानंतरकार थेट कंटेनरखाली घुसली. अपघातावेळी गाडी कोण चालवत होतं, हे नेमकं स्पष्ट झालेलं नाही.

    Maharashtra TimesAmravati Crime : पहिल्या ब्रेकअपमुळे प्लेबॉय बनलो; 180 मुलींचं शोषण करणाऱ्या अयानची निर्लज्ज कबुली, स्टोरी ऐकून पोलीस चक्रावले

    पत्नी, मुलगा गंभीर जखमी

    अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगा हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर अपघातानंतर बराच काळ पत्नी गाडीत अडकलेली होती.

    Nitin Raut | नागपुरात स्वीकृत सदस्य निवडीवरून राजकारण, नितीन राऊतांचे गंभीर आरोप

    खरातच्या अटकेपासून तणावात

    नाशिकमधील महिला अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टचे जितेंद्र शेळके उपाध्यक्ष राहिले आहेत. शेळकेंच्या लॉन्समध्येही खरातची भागिदारी होती. अशोक खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते.

    Maharashtra TimesSolapur Crime : नवऱ्याशी भांडून माहेरी, रीलस्टार सोनाली जाधवचा अनैतिक संबंधातून घात, वाढदिवसालाच प्रियकराने जीव घेतला

    शिवनिका ट्रस्टचे पदाधिकारी

    राजकीय व प्रशासकीय पाठबळातून काही वर्षांत अशोक खरातयाच्या शिवनिका संस्थानला कोट्यवधींच्या देणग्या मिळाल्या होत्या. परंतु गोशाळेसाठी निधी संकलित करुनही काम पूर्ण झालं नाही, त्यामुळे विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला. त्यातील तिघांनी राजीनामे दिले. सध्या संस्थानवर अध्यक्ष म्हणून अशोक खरात, उपाध्यक्ष म्हणून डॉ. जितेंद्र शेळके कार्यरत होते. सरचिटणीसपदी खरातची पत्नी कल्पना खरात असून, महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर, सुभाष गमे, ललित पोफळे, डॉ. नंदकिशोर कातोरे हे विश्वस्त मंडळावर आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा