Beed Railway Police Employee Ends his Life : बीड जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. परळी येथील एका रेल्वे कर्मचाऱ्याने स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलीस कर्मचारी नितीन ढगे आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्याच्या परळी येथील रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने माधवबाग येथे भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मोठी घटना आज सकाळी उघडकीस आली. नितीन पंडीत ढगे (वय ३०, रा. लोहारा ता. लोहारा) असं जिल्हा धाराशिव रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असल्याचं समोर आलं आहे.
आठवडाभरात लग्न
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, परळी येथे जी.आर.पी रेल्वे कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला नितीन ढगे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील लोहार येथील रहिवासी असून त्यांचे अवघ्या आठवडाभरात लग्न होतं, अशी देखील माहिती समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांच्या सुट्टीवर नितीन हे गावाकडे आले होते, आणि परत परळी येथे नोकरीवर रुजू होऊन त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. Jitendra Shelke : खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, समृद्धी हायवेवर कार कंटेनरखाली घुसली
वरिष्ठांचा त्रास असल्याची माहिती
नितीन यांना कामावर असताना वरिष्ठांचा त्रास असल्याची माहिती समोर येत असून त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? याबद्दल अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच परळी येथील शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला असून मयत नितीन ढगे यांचं पार्थिव खाली उतरविण्यात आलं असून उत्तरीय तपासणीसाठी पार्थिव परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.सगळ्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचं संबंधित पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तर रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं? नेमकं आत्महत्या कोणत्या कारणावरून केली? याबाबत कोणतंही कारण समोर आलं नसून ही आत्महत्या की आत्महत्यास प्रवृत्त केलं गेलं आहे. यासह अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. Solapur Crime : नवऱ्याशी भांडून माहेरी, रीलस्टार सोनाली जाधवचा अनैतिक संबंधातून घात, वाढदिवसालाच प्रियकराने जीव घेतला
बायकोच्या छळाला कंटाळून तरुणाचं टोकाचं पाऊल
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नागापूर या गावातील तरुणाने सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या जाचास कंटाळून त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत शेतात जाऊन गळफास घेतल्याची घटना समोर आली होती. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. होतकरू असलेल्या तरुणाला एवढं मोठं पाऊल उचलण्यास भाग पाडलेल्या पत्नी आणि सासरच्या मंडळीला आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांना प्रशासनाने कडक शासन करण्याची मागणी करणारी पोस्ट या तरुणाने लिहित आपलं आयुष्य संपवलं. रामेश्वर गव्हाणे (वय ३०) असं या तरुणाचं नाव आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा