• Sat. Jun 6th, 2026

    Chhatrapati Sambhajinagar Crime : माझ्या प्रमिलाला विष देऊन संपवलं! लग्नानंतर चार वर्षांत लेकीचा संशयास्पद मृत्यू, वडिलांचा टाहो, दोन चिमुकले आईविना पोरके झाले

    Chhatrapati Sambhajinagar Crime : माझ्या प्रमिलाला विष देऊन संपवलं! लग्नानंतर चार वर्षांत लेकीचा संशयास्पद मृत्यू, वडिलांचा टाहो, दोन चिमुकले आईविना पोरके झाले

    Chhatrapati Sambhajinagar News : विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी छळ होत असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला असून, याप्रकरणी पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन चिमुकल्यांचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : मोठ्या हौसेने लेकीचं कन्यादान केलं, पण लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच तिचा असा करुण अंत होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असा हृदयद्रावक टाहो फोडत एका हतबल पित्याने आपल्या मुलीच्या मृत्यूला सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. खुलताबाद तालुक्यातील धामणगाव तांडा येथे २७ वर्षीय विवाहितेने विषारी द्रव्य घेतल्याने संशयास्पद मृत्यू झाला असून, लग्नानंतर अवघ्या चार वर्षांत मुलीबाबत असं घडल्याने खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

    वडिलांचा दावा

    प्रमिला दिनेश राठोड २७ अस संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला यांचा विवाह ४ वर्षांपूर्वी दिनेश राठोड यांच्याशी झाला होता. संसाराची सुरुवातीची काही वर्षे सुखात गेली, मात्र त्यानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून प्रमिला यांचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे प्रमिला खचून गेल्या होत्या. ११ एप्रिल रोजी त्यांना विषारी द्रव्य पाजण्यात आल्याचा दावा त्यांचे वडील नामदेव चव्हाण यांनी पोलीस तक्रारीत केला आहे.

    Maharashtra TimesLok Sabha Seats : लोकसभेच्या जागा 850 होणार, महिला आरक्षण विधेयक मंजुरीनंतरचं चित्र, महाराष्ट्रातील खासदार 48 वरुन थेट 72 वर

    दोन चिमुकल्यांचं छत्र हरपलं

    उपचार सुरू असतानाच १३ एप्रिल रोजी प्रमिला यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात ३ वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षांची मुलगी असा परिवार आहे. आईच्या मृत्यूमुळे या निष्पाप चिमुकल्यांचे छत्र हरपले असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिसांनी पती दिनेश राठोड, सासू निर्मलाबाई राठोड यांच्यासह सात जणांवर गुन्हा नोंदवला आहे.

    पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

    या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सोमवारी सायंकाळी चोख पोलीस बंदोबस्तात प्रमिला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा