• Mon. Jun 15th, 2026
    Mumbai-Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची ट्रेलरला धडक, एकाचा जागीच मृत्यू, 4 जखमी

    Mumbai-Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रेलर अन् कारच्या झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत.

    कारची ट्रेलरला धडक, १ ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, ठाणे: ठाणे जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून कारचालकाचे नियंत्रण सुटून ही कार उभ्या ट्रेलरला मागून धडकल्याने झालेल्या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील चौघे जखमी झाले. ही घटना मंगळवारी पहाटे मुंबई-नाशिक मार्गावर खारेगाव येथे घडली.

    ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या अपघाताची माहिती दिली. वागळे इस्टेट येथून एक तरुणी आणि तीन तरुण कारने कार्यालयातून डोंबिवली पूर्व येथील घरी निघाले होते. मुंबई-नाशिक मार्गावरून जाताना मंगळवारी पहाटे ३.५५ वाजता खारेगाव येथील पेट्रोल पंपाजवळ कारचालक दीपक पटेकर (२६) याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून जोरात धडकली. कार ट्रेलरखाली घुसून दीपक कारमध्ये अडकला होता.

    Maharashtra TimesKalyan Accident: पाच वर्षांपूर्वीच कुंकू हिरावलं; कल्याण अपघातात 3 मुलांचाही करुण अंत, मातेचा काळीज चिरणारा आक्रोश
    पोलिस, अग्निशमन दल, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या दीपकला कारमधून बाहेर काढत कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. दीपक ठाण्यातील वागळे इस्टेटमधील अंबिका नगर परिसरात राहत होता. या अपघातामध्ये सुजय पाटील (२०), राज चिले (२१), सुगम जयस्वाल (२४), स्नेहल भूसेकर (२३) जखमी झाले असून चौघेही डोंबिवलीचे रहिवासी आहेत.
    Maharashtra TimesMaharashtra Heatwave: महाराष्ट्र तापला! पुढील चार दिवस धोक्याचे, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा
    सुजय याच्यावर कळव्यातील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी नवी मुंबईतील घणसोली येथील रुग्णालयात हलवले. गंभीर जखमी राज आणि सुगम यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरकोळ जखमी असलेली स्नेहल हिच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    या अपघातामुळे मुंबई-नाशिक मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. अपघातग्रस्त कार क्रेनच्या मदतीने बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला. कळवा पोलिस अपघाताची चौकशी करत आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा