• Sat. Jun 6th, 2026

    Maharashtra Weather: स्कार्फ, टोप्या घालायची वेळ आली! पुण्यात तापमानाचा प्रवास चाळिशीच्या दिशेने; दोन दिवसांत पारा वाढण्याचा अंदाज

    Maharashtra Weather: स्कार्फ, टोप्या घालायची वेळ आली! पुण्यात तापमानाचा प्रवास चाळिशीच्या दिशेने; दोन दिवसांत पारा वाढण्याचा अंदाज

    Pune Weather 12 April: पुण्यात ढगफूटीसदृश पावासानंतर पुन्हा उन्हाचा चटका वाढण्याला सुरूवात झाली आहे. रविवारी दिवसभर हवामान कोरडे राहून येत्या दोन दिवसांत पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याती शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: शहरात तापमानाच्या पाऱ्याचा प्रवास चाळिशीच्या दिशेने सुरू झाला असून, पुढील आठवडाभरात कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.शहरात शनिवारी दिवसभरात ३९ अंश सेल्सिअस तापमानात नोंदविण्यात आले असून, पुढील दोन दिवसांत या हंगामात पहिल्यांदा पारा चाळीस अंशाच्या पुढे जाणार आहे.

    दोन-तीन अंशांनी वाढणार तापमान

    पुणेकरांनी ऐन उन्हाळ्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीसदृश पाऊस आणि रात्रीचा गारवाही अनुभवला; पण रविवारपासून वातावरण तापायला सुरुवात होणार आहे. पुढील दोन दिवसांत पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागांत आकाश कोरडे राहणार असून, कमाल तापमानात दोन ते तीन अंशांत वाढ होणार आहे. पुणेकरांनी शनिवारी याची चुणूक अनुभवली. मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांतही उन्हाचे चटके बसत होते. लोहगाव येथे दिवसभरात ४०.६, तर कोरेगाव पार्क येथे ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शनिवारी सुट्टी असलेले नागरिक टोप्या, स्कार्फ घालून कामाला बाहेर पडले होते. रात्रीच्या उकाड्यातही वाढ नोंदविण्यात आली.Maharashtra TimesMumbai Weather: मुंबई पुन्हा तापली! उष्म्याने नागरिक अस्वस्थ; वाऱ्याची दिशा बदलल्याचा हवामान विभागाचा अंदाज

    भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात उष्णतेची लाट येत्या काही दिवसांत तीव्र होणार असून विविध भागांमध्ये हवामान कोरड राहणार आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. पुण्यात रविवारी दिवसभर किमान तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच, कमाल तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंक पोहोचण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, कोकणात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीजवळील भागांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून उष्णता वाढणार आहे. रविवारी दिवसभर वातावरण ढगाळ राहिलं तरी पावसाची शक्यता नाही. किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहणार आहे.

    Maharashtra TimesMumbai Local: आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष लोकल; CSMT-कल्याण, पनवेल मार्गावर मध्यरात्री अतिरिक्त फेऱ्या; कसं असेल वेळापत्रक?

    विदर्भात कसं असेल तापमान?

    विदर्भात दुपारी तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस असून कमाल तापमानाचा पारा 38 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वाढत्या उकाड्यामुळे काही भागांत उष्मघाताचा धोका वाढण्याचीही शक्यता आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रात उष्णता दिवसभर कायम असली तरी हलके वारे सुरू राहील. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा