Nashik Accident: सिन्नर तालुक्यात पंचाळे-शहा रस्त्यावर दोन वाजेच्या सुमारास ट्रक अन् पिकअपची जोरदार धडक झाली. यात पिकअपला आग लागून एकाच कुटुंबातील दोन महिला व दोन पुरुषांचा होरपळून मृत्यू झाला.
सिन्नर अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: जागरण-गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या पंचाळे गावातील कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. भीषण अपघातात पेटलेल्या पिकअपने (एमएच १५/जेसी ६३३३) नवपरिणत दाम्पत्यासह चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. सिन्नर तालुक्यातील पंचाळे-शहा रस्त्यावर शिंदेवाडी शिवारातील खाडे वस्तीलगत आयशर टेम्पो आणि पिकअप यांच्यात शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
या प्रकरणी प्रवीण अशोक काळे (रा. खोडद, ता. जुन्नर) या आयशर टेम्पो (एमएच १४/एमटी ३८३९) चालकाविरुद्ध मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांमध्ये शुभम गणेश नवले (वय २१) व रिंकू शुभम नवले (१९) हे नवविवाहित दाम्पत्य, त्यांची आजी मीराबाई विश्वनाथ गांगुर्डे (६८, सर्व रा. पंचाळे) व पीकअप चालक किरण रवींद्र मोरे (वय २३) यांचा समावेश आहे.
Nashik ZP: दप्तर दिरंगाई झाल्यास थेट कारवाई; नाशिक जिल्हा परिषदेचे CEO ओमकार पवार यांचा इशारा पिकअपमधील सुनीता गणेश नवले (३८), सचिन गणेश नवले (१८), दिव्या गणेश नवले (१७), समीक्षा अनिल गांगुर्डे (९), अदिती पांडुरंग आहेर (१३), आरती पांडुरंग आहेर (९) आणि देवांश किरण मोरे (२) जखमी झाले. अपघातात आयशर टेम्पोने पिकअपला सुमारे १०० फूट ओढत नेले.
Nashik Crime : सिंगल असल्याचं भासवून फ्लर्ट, WhatsApp ग्रुपवर प्लॅन, आठ तरुणींशी जवळीक, नाशिकच्या MNC मध्ये धर्मांतराचं जाळं एका चितेवर तिघांचा अंत्यविधी अपघातात चालक किरण मोरे, तसेच पती-पत्नी शुभम व रिंकू नवले यांचे मृतदेह आगीत कोळसा झाले होते. त्यामुळे पंचाळे येथील स्मशानभूमीत या तिघांवर एकाच चितेवर अंत्यविधी करण्यात आला. मीराबाई गांगुर्डे यांच्यावर स्वतंत्र अग्निसंस्कार करण्यात आले. या वेळी नवले आणि मोरे कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा