Nagpur solar power News: सध्या देशासह राज्यात महागाईने उच्चांक गाठलेला आहे. अशातच नागपूरकरांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राच लक्ष वेधून घेतोय.नागपूरात सर्वात जास्त कुटुंबांनी रूफटॉप सोलर बसवलेत.तब्बल या कुटुंबांची संख्याही १लाख ८ हजार ४९८वर गेली आहे.
१ लाख ८ हजार ४९८ कुटुंबांची सौरऊर्जेला पसंती
पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करत नागपुरात रूफटॉप सोलर बसवण्याचा वेग वाढला आहे. १५ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, शहरातील १ लाख ८ हजार ४९८ कुटुंबांनी सौरऊर्जा प्रकल्पांना पसंती दिली आहे. यावरून नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘पीएम सूर्य घर-मोफत वीज’ योजनेला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
पीएम सूर्य घर सरकारी योजना
‘पीएम सूर्य घर’ ही केंद्र सरकारची देशातील एक कोटी घरांच्या छतांवर रूफटॉप सोलर पॅनेलबसवून नागरिकांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणारी योजना आहे. या योजनेंतर्गत घरगुती ग्राहकांना एक ते दोन किलोवॉट क्षमतेसाठी ३० हजार रुपये प्रतिकिलोवॉट, तर तीन किलोवॉट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपयांपर्यंत थेट शासकीय अनुदान दिले जाते.
नागपूर जिल्हा महाराष्ट्रात अवल्ल तर देशात द्वितीय क्रमांकावर
या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये आहे. राज्यात ‘पीएम सूर्य घर’ योजनेंतर्गत ६.७३ लाखांहून अधिक घरगुती रूफटॉप सोलर यंत्रणा स्थापित करण्यात आल्या आहेत. नागपूर शहर व जिल्ह्यात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नागपूर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम, तर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Pune News : आमचूर ठरलं आदिवासी कुटुंबांचा उत्पन्न स्त्रोत ;आमचूरने निर्माण केली बाजारपेठ
पर्यावरण संवर्धनाला मदत करणारे नागपूर
नागपुरात एकूण लाभार्थी कुटुंबांची संख्या १ लाख ८ हजार ४९८वर पोहोचली आहे. या लोकसहभागातून रूफटॉप सोलरद्वारे तब्बल ३५८.९१ मेगावॉट सौरऊर्जा क्षमतेची निर्मिती झाली आहे. कोळशावर आधारित विजेचा वापर कमी झाल्याने पर्यावरण संवर्धनालाही मदत होत आहे. एका घरात सोलर प्रकल्प बसल्यानंतर आसपासची अनेक कुटुंबेही या योजनेकडे आकर्षित होत आहेत. मोफत विजेमुळे नागरिकांच्या मासिक वीजबिलात मोठी बचत होत असल्याने या योजनेची लोकप्रियता वाढत आहे.
Nashik Rain: नाशिकमध्ये पावसाचे धुमशान! गोदावरीला यंदा पहिलाच पूर; जिल्ह्यात दोघांचा करुण अंत, आज ‘यलो अलर्ट’
२० ते २५ वर्ष वीज मोफत
नागपूरातीत सर्वात जास्त घरे सौरऊर्जा प्रकल्पाचा वापर करून आपल्या पैशाची बचत करतात आणि आणि मोफत वीज घरात वापरतात.या रूफटॉप सोलारचे फायदे ओळखून नागपूरकरांनी हा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सोलार पॅनेलसाठी येणारा खर्च हा ४ ते ५ वर्षात वसूल होतो.आणि त्यानंतर मात्र पुढची २० ते २५ वर्ष मोफत वीज वापरता येते.
