या मोहिमेत नाशिक शहरातील कारवायांना प्राधान्य देत पथकाने विशेष पावले उचलली. चौक मंडई, जुने नाशिक येथील ‘मेसर्स भारत जनरल स्टोअर’वर कारवाई करून १ लाख १ हजार ७२६ रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित दुकान सील करण्यात आले आहे. तसेच आडगाव येथील जत्रा हॉटेल परिसरातील ‘मेसर्स स्वागतम स्वीट्स’ येथून ५ हजार ७६० रुपये किमतीचे ९ किलो निकृष्ट व भेसळयुक्त संशयित गायीचे तूप जप्त करण्यात आले.
Chhatrapati Sambhajinagar: छत गळतंय, विद्यार्थी पाणी काढतायत; फुलंब्रीत ZP शाळेचं धक्कादायक वास्तव, शिक्षण विभागावर संताप
नाशिक शहराव्यतिरिक्त मालेगाव तालुक्यातही दोन मोठ्या जप्ती करण्यात आल्या. चंदनपुरी शिवार येथील ‘मेसर्स श्रीराम एंटरप्रायझेस’ येथून विनापरवाना उत्पादन, विक्री बिल नसणे आणि भेसळीच्या संशयावरून १७ लाख २७ हजार रुपये किमतीचे सैल स्वरूपातील रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. तर कल्ली कुट्टी येथील ‘मेसर्स ए-वन ताज बेकरी’ वर अत्यंत अस्वच्छ वातावरणात आणि विनापरवाना व्यवसाय चालवला जात असल्याने कारवाई करण्यात आली.
BMC FDA Action: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन सील, काय कारण?
तेथून १ लाख ६० हजार रुपये किमतीचा चारशे किलो टोस्ट जप्त करून बेकरीला ‘व्यवसाय बंद’ ची नोटीस बजावण्यात खेळ करणाऱ्या आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाची गय केली जाणार नाही आणि भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्रतेने सुरूच राहतील, असा सज्जड इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
जप्त मुद्देमाल…
कारवाईचे ठिकाण —जप्त केलेला मुद्देमाल-एकूण किंमत (रुपयांत)
भारत जनरल स्टोअर, जुने नाशिक —प्रतिबंधित अन्नपदार्थ १ लाख १ हजार ७२६
स्वागतम स्वीट्स, आडगाव, नाशिक —गायीचे तूप, ९ किलो : ५ हजार ७६०
श्रीराम एंटरप्रायझेस, मालेगाव —रिफाइंड सोयाबीन तेल १७ लाख २७ हजार
ए-वन ताज बेकरी, मालेगाव —टोस्ट ४०० किलो : १ लाख ६० हजार
एकूण-एकत्रित जप्त माल —सोयाबीन तेल, टोस्ट, तूप १९ लाख ९४ हजार ४८६
महाराष्ट्रात एफडीएकडून धाडसत्र सुरु आहे. तरीही भेसळयुक्त पदार्थ, निकृष्ठ अन्नपदार्थ, औषधं आढळतच आहे. प्रशासनाचा दरारा संपलाय का? याबाबत तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा…
