Jalna Murder Case: निखिलने आपल्या आईला मेसेज केल्याचा राग त्याच्या मनात होता. या संशयाने त्याच्या मनात सूडाची भावना हळूहळू वाढत गेली.
तरुणाच्या हत्या प्रकरणाचे गूढ उकलले; जीवलग मित्रानेच संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जालना: शेतात झोपलेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आलं असून जीवलग मित्रच आरोपी निघाला आहे. 11 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जालना तालुक्यातील सिरसवाडी येथे घडलेल्या एका भीषण आणि धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मात्र जीवलग मित्रानेच आपल्या मित्राचा गळ्यावर चाकूने वार करत त्याचा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण निखिल वाघमारे (वय 26) हा शुक्रवारी रात्री आपल्या मित्रांसोबत गावाजवळील शेतात झोपण्यासाठी गेला होता. दरम्यान, 11 एप्रिल रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्याची हत्या करण्यात आली. विधी संघर्षग्रस्त बालकाकडून ही हत्या करण्यात आली असून तो निखिलचा जवळचा मित्र होता. मात्र, काही दिवसांपासून त्याच्या मनात निखिलबद्दल संशय निर्माण झाला होता.
घटनेच्या दिवशी दोघेही एकत्र वेळ घालवत होते. वातावरण सामान्य असल्याचे दिसत असतानाच, रात्री निखिल गाढ झोपेत असताना विधी संघर्ष ग्रस्त बालकाने संधी साधली. त्याने धारदार शस्त्राने निखिलच्या गळ्यावर वार करत त्याची निर्दयी हत्या केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे निखिलला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही, त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्याच्या काही चुलत भावांनी आरडाओरड केला. कुटुंबातील सदस्यही पळत आले व त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी निखिलला मृत घोषित केले.
सदर घटनेची माहिती जालना तालुका पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे आपल्या फौज फाट्यासह तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. वरिष्ठांना सदर घटनेची माहिती देण्यात आली आणि पोलिसांची सूत्रे कामाला लागली. पोलिसांनी आपल्या खबऱ्यांमार्फत तात्काळ माहिती घ्यायला सुरुवात केली व अवघ्या पाच तासांतच खुनाचा उलगडा झाला.
गावातीलच एका विधी संघर्षग्रस्त बालकाने निखिल वाघमारेवर हल्ला करत त्याला ठार केल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशावरून तात्काळ एक पथक तैनात केले व परिसरात सापळा रचून काही तासांतच विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. यावेळी चौकशीत समोर आले की निखिल वाघमारेने त्या विधी संघर्षग्रस्त बालकाच्या आईला मोबाईलवर मेसेज केला म्हणून त्याने निखिलचा खून केल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ सोबत बोलताना दिली आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा